Molcornem Quepem: दुर्दैवी! अखेरपर्यंत लढला पण हरला; मळकर्णे येथे पाण्यात पडलेल्या गव्याचा अंत

वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.
Molcornem Quepem
Molcornem QuepemDainik Gomantak
Published on
Updated on

Molcornem Quepem: केपे तालुक्यातील मळकर्णे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा फूट पाण्यात पडलेला गवा पाण्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक तास धडपडला पण अखेर त्याची धडपड अपयशी ठरली व त्याचा मृत्यू झाला. वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मळकर्णे येथे सहा फूट पाण्याच्या एक मोठ्या डबक्यात एक गवा पडला. गवा बाहेर येण्यासाठी धडपड करत होता पण, त्याला बाहेर येण्यासाठी पुरेसा आधार मिळत नव्हता. तसेच, खड्डा मोठा असल्याने गव्याला बाहेर येता आले नाही.

स्थानिकांनी घटनेची माहिती वन खात्याला दिली. वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी तब्बल तीन तासानंतर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांनाही गव्याला बाहेर काढता आले नाही. अखेर गव्याचा धडपडून मृत्यू झाला.

गव्याला बाहेर कसे काढायचे? वन खात्याला माहितच नाही.

घटना घडल्यानंतर स्थानिकांनी वन खात्याला माहिती दिली. पण, वन खात्याचे अधिकारी तब्बल तीन तासानंतर घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झाले खरे पण, वन खात्याकडे गव्याला बाहेर कसे काढायचे याबाबत काहीच नियोजन नव्हते. त्यामुळे वन खात्याचे अधिकारी हतबल दिसून आले. पाण्यात गव्याची अनेक तासांची धडपड अपयशी ठरली आणि त्याने प्राण सोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Swiggy Rs 93 Lakh Theft
Bardez Land Scam
Devasa Quepem Cow Shelter Sheds Demolished
Quepem Fire Incident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com