Goa : बीचवरच अवघ्या दीड हजारात 'ओपन एअर मसाज', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना आली जाग

Candolim Beach Goa: समुद्रकिनाऱ्यावर अवैध पद्धतीने मसाज सेवा देणाऱ्या महिलांना कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बीचवरच अवघ्या दीड हजारात 'ओपन एअर मसाज', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना आली जाग
Candolim Beach GoaViral Video

कांदोळी समुद्र किनाऱ्यावर खुल्या जागेत पर्यटकांना महिला मसाज करत असत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ समाज माध्यामांवर व्हायरल झाल्यानंतर जागे झालेल्या कळंगुट पोलिसांनी संशयित महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर काही महिला पर्यटकांना मसाज देत असल्याचा व्हिडिओ समोर आला. व्हिडिओत पाच ते सहा महिला काही देशी पर्यटकांना बीचवरील खुल्या जागेत मसाज सेवा देत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी याची दखल घेत संशयित महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिला आहे.

नियमांनुसार समुद्रकिनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय करता येत नाही.

बीचवरच अवघ्या दीड हजारात 'ओपन एअर मसाज', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना आली जाग
Mhadei Water Dispute: 'गोमंतकीयासाठी म्हादई पवित्र, सरकार ती विकणार नाही असे वचन द्या' - विजय सरदेसाई

या महिला एका पर्यटकाकडून प्रत्येक मसाजसाठी एक हजार ते दीड हजार रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तर, विदेशी पर्यटकांकडून यासाठी पाच ते सहा हजार रुपये घेत जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी संशयित महिलांना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु आहे.

समुद्रकिनारी सुरु असणाऱ्या अवैध व्यवसांयाकडे पोलिसांचे दुर्लेक्ष

राज्यात येणारे पर्यटक समुद्रकिनारी भेट देत असतात. या पर्यटकांना ज्यादा पैसे आकारुन खाद्यपदार्थांसह इतर वस्तूंची विक्री केली जाते. नियमांनुसार समुद्र किनाऱ्यावर अवैध व्यवसाय करण्यास बंदी आहे. पण, या अवैध व्यवसायांकडे राज्यातील पोलिसांचे दुर्लेक्ष होत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्याआडून असे व्यवसाय करण्याचे धाडस कसे येते असा प्रश्न सध्या स्थानिक उपस्थित करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com