Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरील दोघा कर्मचाऱ्यांनी ब्रिटिश महिलेला लुबाडले

व्हीलचेअरवरील महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा, ईमेलवरून नोंदवली तक्रार, चौकशी सुरू
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak

Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांवर एका 62 वर्षीय ब्रिटीश महिलेने व्हीलचेअर सेवा देण्यासाठी पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने या प्रकरणी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि गोवा पोलिसांकडे तक्रार केली आहे.

गोवा पोलीस विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार तक्रारदार कॅथरीन फ्रान्सिस वोल्फ यांना चालण्यास त्रास होत आहे. त्या 29 जानेवारी रोजी लंडनच्या गॅटविक विमानतळावरून TUI एअरवेजच्या TOM 031 या फ्लाइटने त्या गोव्यात आल्या. दाबोळी विमानतळावर उतरल्यावर विमानतळ व्यवस्थापकाने या महिलेला व्हीलचेअरवर बसवून तिचे सामान घेऊन जाण्यासाठी दोन कर्मचारी पाठवले.

Dabolim Airport
CM Pramod Sawant: गोव्यात फेब्रुवारीत होणार योग महोत्सव; योगगुरू बाबा रामदेव यांना निमंत्रण

कॅथरीन यांना चालण्याचा त्रास होत असल्याने त्यांना व्हीलचेअर देण्यात आली होती. पण त्यांच्यासोबतच्या दोन कर्मचाऱ्यांनी कॅथरीन यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला. या दोघा कर्मचाऱ्यांनी कॅथरीन यांना विमानतळावर एका ठिकाणी थांबवले आणि आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुला येथेच सोडू, पुढे घेऊन जाणार नाही, असे सांगितले.

कॅथरीन यांनी त्यांना वारंवार विनंती करूनही ते कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते. अखेर सोबतचे सामान आणि स्वतः व्हीलचेअरवर असल्याने कॅथरीन यांनी दोघांना 4 हजार रूपये दिले. त्यानंतर दोघेही कर्मचारी त्यांना सोडण्यास तयार झाले.

Dabolim Airport
Goa Crime: बस्तोडा येथे घरात आढळून आला महिलेचा कुजलेला मृतदेह

ईमेलद्वारे तक्रार

या प्रकारामुळे कॅथरीन यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. त्यांनी नंतर एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया आणि गोवा पोलिसांकडे ईमेलद्वारे तक्रार करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

अद्याप गुन्हा दाखल नाही

या संदर्भात गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक एसव्हीटी धनंजय राव यांनी तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे दाबोळी पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com