Goa Accident : गोव्यात दोन अपघातांमध्ये दोघांचा जागीच मृत्यु; ट्राफिक पोलिसांच्या बुथवर आदळली दुचाकी

कार पलटी झाल्याने घडला दुसरा अपघात
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गोव्यातील लोकसंख्या पाहिल्यास राज्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बरेच मोठे आहे. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. गोव्यात जानेवारी महिन्यात 30 जणांना अपघाती मृत्यू झाला.

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण यावे यासाठी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर तसेच हेल्मेट आणि सीटबेल्ट न घालता वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई बडगा उगारला आहे.

Goa Accident
Maharashtra Day 2023: गोवा राजभवनवर महाराष्ट्र दिन साजरा; राज्यपाल म्हणाले...

दरम्यान आज राज्यात दोन अपघातांच्या घटना समोर येत आहेत. या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील पहिला अपघात हा आरपोरा येथे झाला. चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी गोवा पोलिसांच्या बुथवर जावून आदळली त्यामुळे त्याचा जागीच मृत्य झाला.

अपघातात कर्नाटकातील रियाझ पिंजार याचा जागीच मृत्यु झाला. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Goa Accident
CM Pramod Sawant: गोव्यातील 90 टक्के गुन्हे बिहार, युपीतील कामगारांमुळे; मुख्यमंत्र्यांचा परप्रांतीयांवर निशाणा

तर दुसरा अपघात बेतोडा बोरी बायपास रोडवर स्वयंअपघात घडला. हा अपघात कार उलटल्याने घडला. यात एकाचा जागीच मृत्यु झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी फोंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेतोडा बोरी बायपास रोडवर कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या मधोमध उलटली. अपघातात कारचालक पांका कोठारकर याचा जागीच मृत्यु झाला. विनय गुप्ता (32), अनिस कुसवा (20), राजू कुसवा (25), रणजित कुसवा (26) व तपस पत्रा (24) सर्वजण मूळ उत्तर प्रदेश, सध्या राहणार वेर्णा यांचा जखमी मध्ये समावेश आहे.

कामगार दिनी सुट्टी असल्याने वेर्णा येथील औद्योगिक वसाहतील कामगाराचा गट उसगाव येथील फार्ममध्ये पिकनिक साठी जात असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com