Two died by drowning in the well At Gulem canacona
Two died by drowning in the well At Gulem canaconaDainik Gomantak

Canacona: विहीरीत बुडून दोघांचा मृत्यू; काणकोण गुळे येथील घटना

पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Published on

Canacona News: काणकोण गुळे येथे दोन व्यक्ती विहीरीत पडल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह विहीरी बाहेर काढण्यास अग्निशामन दलाला यश आले. तर दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Two died by drowning in the well At Gulem canacona
Football: राष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या मुली अंतिम फेरीत

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही बुडालेले इसम तेथील पेट्रोल पंपावरील कर्मचारी होते. तसेच दोघेही पोहण्यात तरबेज होते. दोघेही आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विहिरीत मृत कासव काढण्यासाठी उतरले होते. यावेळी ते बुडाल्याचे तेथील स्थानिकांना कळताच त्यांनी अग्निशामक दलाचे जवान आणि काणकोण पोलिसांना संपर्क साधला.

अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्यांचा शोध सुरू केला. या शोधकार्यात एकाचा मृतदेह विहीरी बाहेर काढण्यास अग्निशामन दलाला यश आले. तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com