Cutbona Jetty Dengue: कुटबण जेटीवर डेंग्यूचा शिरकाव! 2 मजूर बाधित; आरोग्य खात्याकडून 2.5 हजार मजुरांची तातडीने तपासणी

Cutbona Jetty Dengue Cases: मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होऊन महिना होत असतानाच कुटबण जेटीवरील दोन मजुरांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले.
Cutbona Jetty Dengue Cases
Cutbona Jetty DengueDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होऊन महिना होत असतानाच कुटबण जेटीवरील दोन मजुरांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले. त्‍यानंतर आरोग्य खात्याने तातडीने जेटीवरील सुमारे अडीच हजार मजुरांची तपासणी केली.

डेंग्यूची लागण झालेल्‍या दोघांनाही बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे जेटीवरील मूलभूत स्वच्छता सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांत येथे डेंग्यू, मलेरिया आणि कॉलरासारखे आजार कुटबण जेटीवरील मजुरांना झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे.

Cutbona Jetty Dengue Cases
Goa Drug Case: लायबेरियन ड्रग्स संशयिताचा जामीन पाचव्यांदा नाकारला; गुन्हेगारी पार्श्वभूमीही न्यायालयाने तपासली

मत्स्यव्यवसाय खात्याला इशारा

कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि जेटीवरील वाढती गर्दी यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आजारांचा आणखी फैलाव झाल्यास ट्रॉलरमालकांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा आरोग्य खात्याने मत्स्यव्यवसाय खात्याला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com