Yoga Training : प्राथमिक शिक्षकांसाठी योगा प्रशिक्षण कार्यक्रम

पंतप्रधानांनी व अनेक देशांनी योगास महत्त्व दिले
two days yoga training for primary school teachers
two days yoga training for primary school teachersDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी : येथील गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदच्या सभागृहात गुरुवार, 20 रोजी सकाळी 10 वा.पासून गोवा शिक्षण विकास महामंडळ, शिक्षण संचालनालय, क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय यांनी संयुक्तपणे सरकारी प्राथमिक शिक्षकांसाठी दोन दिवसीय योगा शैक्षणिक रिफ्रेशर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला.

यावेळी प्रमुख पाहुणे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जीआयडीसीचे चेअरमन गोविंद पर्वतकर, एससीईआरटीचे संचालक शंभू गाडी, एमडी ॲलेक्स डिसोझा व अनेक शिक्षक उपस्थित होते. योगा हा विषय येत्या शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शाळांमध्ये अनिवार्य करण्यात आला असून, त्यासाठी प्राथमिक शाळांतील शिक्षकांना यापूर्वी प्रशिक्षण दिले गेले होते.

परंतु कोरोना काळामुळे ते मध्ये स्थगित करावे लागले त्यासाठी हा दोन दिवसीय योगा शैक्षणिक रिफ्रेशर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जीआयडीसीचे अधिकारी यागेश नाईक यांनी दिली.

two days yoga training for primary school teachers
Goa Weather Updates : हवामान विभागाचा इशारा; पुढील दोन दिवस असा असणार तापमानाचा पारा

पंतप्रधानांनी व अनेक देशांनी योगास महत्त्व दिले आहे. योगामुळे भारताला जागतिक स्तरावर मान मिळाला आहे. योगा, आयुर्वेद, भरतनाट्यम्‌ वगैरे गोष्टींमुळे भारताची मान उंचावली आहे. त्यामुळे त्यामुळे योगा अत्यंत जरूरी झाले आहे.

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

two days yoga training for primary school teachers
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांत घट, दक्षिण गोव्यात वाढ; जाणून घ्या आजचे दर

योगामुळे भारताला एक प्रकारचा सन्मान मिळाला असून बाहेरच्या देशामध्ये भारतीयांना अत्यंत मानाने वागवले जाते. १९३ देशांनी योगा चार्टर्डवर सह्या केल्या आहेत, हा एक रेकॉर्ड असून, भारताला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

- गोविंद पर्वतकर, जीआयडीसीचे चेअरमन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com