मोरजी: इब्रामपूर येथे तिलारी धरणात (Tilari Dam) दोन गव्यांचा (Cows) मृत्यू झाल्याची घटना घडली , दोडामार्ग-गोवा (Dodamarg-Goa) सीमेवरील ही घटना घडली आपत्कालीन पथकाच्या मदतीने वनविभागाची बचाव मोहीम जोरदार सुरू होती सुखरूप दोन्ही गव्यांना वरती काढण्यात आले मात्र लगेच त्याचा मृत्यू (Death) झाला.
तिलारी धरणाच्या कालव्यात दोन भले मोठे गवे कोसळल्याचा प्रकार दोडामार्ग-गोवा सीमेवर इब्रामपूर येथे घडला. ही घटना वनविभागाला कळल्यानंतर त्या ठीकाणी गोवा वनविभागाच्या अधिकार्यांनी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा वनविभागाने आपत्ती विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने दोरी घालून त्यांना बाहेर काढले. याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी अनिल केरकर यांनी दिली.
ही घटना आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान दुपार पर्यत हे बचावकार्य सुरू होते.
दोन्ही गव्यांना बाहेर काढण्यात यश आल्यानंतर वनविभाग आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला।
मात्र हे दोन्ही गवे मरण पावले ,वनाधिकारी यांच्या माहिती नुसार दोन्ही गव्याने पाण्यातच युद्ध केल्याने ते जखमी झाले होते ज्यावेळी त्यांना वरती काढले तेव्हा त्यांच्या अंगावर ठीक ठिकाणी जखमा होत्या ,डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार केले अजून शवंचिकित्सा अहवाल आला नसल्याचे अधिकारी महेश म्हामल यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.