वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक: तीन मुलींची सुटका

पोलिसांनी सुटका केलेल्या मुलींची मेरशी येथील अपना घरात रवानगी केली आहे.
Two arrested in prostitution case Three girls released
Two arrested in prostitution case Three girls released Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: वेश्या व्यवसायप्रकरणी (prostitution case) कोलवा पोलिसांनी (Goa Police) शनिवारी केलेल्या कारवाईत हिना पठाण (34, महाराष्ट्र), अरुण कुमार (28, हरियाणा) आणि सतवंत सिंग (27, हरियाणा) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून अरुण आणि सतवंत यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तीन मुलींची सुटका करण्यात आली.

Two arrested in prostitution case Three girls released
कर्नाटकाच्या त्या असाहाय्य महिला मागत होत्या जीवाची भीक

कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास कोलवा समुद्र किनाऱ्यावरील वाहनतळ परिसरात छापा टाकला. संशयित हे मुलींना ग्राहकांना सुपूर्द करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या ठिकाणी येऊन संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी तीन मुलींची सुटका करण्यात आली. हे संशयित वेगवेगळ्या राज्यांतून मुलींना आणून वेश्या व्यवसायात गुंतवत होते. पोलिसांनी सुटका केलेल्या मुलींची मेरशी येथील अपना घरात रवानगी केली आहे. पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com