शिवोली : पार्किंग शुल्कावरून झालेल्या वादात पार्किंग वसुलीदार सागर नाईक याचा शुक्रवारी खून झाला होता. हणजूण येथील या खून प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. मात्र, शनिवारी सागरचा शवचिकित्सा अहवाल हाती आल्यानंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागर याच्याकडे कर्नाटकाच्या असाहाय्य महिला आपल्या जीवाची भीक मागताना दिसत आहेत. त्यामुळे सागरचा खून कसा झाला, हा प्रश्न कायम असून सीसीटीव्ही फुटेज व्यवस्थित तपासल्यानंतरच त्याचा उलगडा होणार आहे.
हणजूण किनाऱ्यावर शुक्रवारी दुपारी पार्किंग वसुलीदार आणि कर्नाटकच्या पर्यटकांत हाणामारी झाली होती. यात सागर नाईक याचा मृत्यू झाला होता. प्रकरणानंतर पळून जात असलेल्या कर्नाटकच्या पर्यटकांना पाळोळे (काणकोण) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर त्यांची रवानगी हणजूण पोलिसांत करण्यात आली. कर्नाटकच्या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप लावण्यात आला असून, त्यांची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
फुटेजमध्ये काय?
सागर नाईक हा महिलांसहित पाच पुरुषांना दंडुक्याच्या साहाय्याने जबर मारहाण करीत असल्याचे दिसून आल्याची माहिती निरीक्षक गावस यांनी दिली. यावेळी असाहाय्य महिला सागरच्या पायावर लोळण घेऊन जीवाची भीक मागत होत्या. दुसरीकडे, पोलिसांकडे सागरबद्दलच्या अनेक तक्रारी असून, यामध्ये धमकावणे, पैसे वसूल करणे, मारहाण करणे याचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी या प्रकरणीही सागरचाच दोष असल्याची माहिती दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.