दिव्यांगजन आयोग, समाज कल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या सहकार्याने राष्ट्रीय पर्पल फेस्टची तयारी सध्या सुरु आहे. मात्र या फेस्टवरून आता गोव्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. या पर्पल फेस्टसाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या निवडीची निविदा रद्द करण्याची मागणी करत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष - अमित पाटकर यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केलीय.
पर्पल फेस्टसाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या निवडीची निविदा रद्द करण्याची मागणी करत गोव्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली. काँग्रेस मीडिया सेलच्या अध्यक्षांनी काल पर्पल फेस्टचे काम टेंडरशिवाय कसे सुरू केले याचा पर्दाफाश केला होता.
पर्पल फेस्टसाठीच्या कामांची निविदा काढण्याअगोदरच काम सुरु सुरु केल्याने काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर हल्लाबोल चढवला होता. "पर्पल फेस्ट 2023 चा पहिला घोटाळा आहे. फेस्टची निविदा 2 जानेवारी रोजी याची काढली जाणार आहे. परंतु भाजपच्या इनहाऊस एजन्सीने त्या अगोदरच हे काम सुरू केले आहे. गोवा राज्य अपंग व्यक्ती आयोग याची दखल घेऊन कारवाई करेल. लोकायुक्तांचे हे कृत्य भ्रष्टाचारी आह. असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.