Jumping Chicken: बेडकांची शिकार करणारे दोघेजण गजाआड; वन खात्याच्या गस्ती पथकाने रंगेहाथ पकडले

Forest Department: किटल केपे येथील आळारे तळप येथे बेडकांच्या शिकारीला गेलेल्या दोघांना वन खात्याच्या गस्ती पथकाने रंगे हाथ पकडले.
Frogs
FrogsDainik Gomantak

Jumping Chicken: पहिल्या पावसात प्रजोत्पादनसाठी शेताच्या काठी येणाऱ्या बेडकांची गोव्यात मोठ्या प्रमाणावर शिकार होत असून किटल केपे येथील आळारे तळप येथे बेडकांच्या शिकारीला गेलेल्या दोघांना वन खात्याच्या गस्ती पथकाने रंगे हाथ पकडले.

अटक केलेल्यांची नावे उल्डेरीक फर्नांडीस आणिजेम्स परेरा अशी असून ते दोघेही वेळ्ळी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे दोन बेडके सापडली. ही बेडके पकडण्यासाठी त्यांनी बरोबर घेतलेले टॉर्च वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले.

Frogs
Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

पिसोर्णे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. केपे येथे अन्य एक ठिकाणीं असाच आणखी एक प्रकार आढळून आला. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची सुलुस लागल्याने शिकारी पळून गेले.

Frogs
Goa Crime News : दोन अल्पवयीन मुलींवर गोव्यातील हॉटेलमध्‍ये लैंगिक अत्याचार, एकाला अटक

दरम्यान, बेडकांची गणती संरक्षित प्रजातीत होत असून त्यांची शिकार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामूळे अशी शिकार करणारे सापडल्यास त्यांच्यावर कडक करवाई कऱण्यात येणार असल्याचा इशारा दक्षिण गोव्याचे उप वनपाल आनंद जाधव यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com