Goa ST Community Reservation: बाळ्ळीच्या आंदोलनात युवा कार्यकर्त्यांचा बळी भाजप - संघामुळेच गेला:- शिरोडकर

मडगावातील मेळाव्यात जाहीर आरोप : भाजपविरोधात आक्रमक व्यूहरचनेचे संकेत
Goa ST Community Reservation
Goa ST Community ReservationDainik Gomantak

Goa ST Community Reservation: बाळ्ळी येथील आंदोलनात मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप या युवा कार्यकर्त्यांचा बळी गेला. त्याला भाजप आणि संघ जबाबदार असल्याचा आरोप ‘एसटीं’च्या मडगावातील मेळाव्यात करण्यात आला.

या आंदोलनाचा फायदा भाजपला मिळून ते सत्तेवर यावेत, यासाठी मुद्दाम हे आंदोलन चिघळवले, असा आरोप गोविंद शिरोडकर यांनी केला.

वास्तविक, या आंदोलनाची पूर्वतयारी करताना महत्त्वाच्या एसटी नेत्यांना काळोखात ठेवून संघातील लोकांनी त्याचे आयोजन केले. बाळ्ळीसारखे लहान गाव त्यासाठी मुद्दाम निवडले. या गावात नाकाबंदी केल्याने लोक बिथरले.

त्यातूनच हे जळीतकांड घडले, असे शिरोडकर म्हणाले. एकूणच या मेळाव्याचा रागरंग भाजपविरोधी असाच होता. आज लोहिया मैदानावरून सुरू झालेले हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निश्चय केल्याचे जाणवत होते.

Goa ST Community Reservation
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आजचे भाव

या मेळाव्यातून एसटी युवा नेत्यांचा एल्गारही दिसून आला. आम्हाला आमच्या मागण्या मान्य करून देण्यासाठी दोन युवा नेत्यांचा बळी द्यावा लागला. आता राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी आणखी बळी जावेत असे सरकारला वाटते का, असा सवाल रामा काणकोणकर यांनी केला.

तर भाजपमधील एसटी आमदारांना प्रश्र्न करताना रवींद्र वेळीप यांनी, जर आमच्या मागण्या १२ वर्षे लांबवत ठेवायच्या होत्या, तर आंदोलन कशाला केले? ते केले नसते तर निदान मंगेश आणि दिलीप यांचे प्राण तरी वाचले असते, असेही ते म्हणाले.

Goa ST Community Reservation
Goa ST Community Reservation:...अन्यथा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करू; मेळाव्यातून एसटी नेत्यांचा इशारा

एसटी आमदारांनाही केले लक्ष्य

या मेळाव्यात भाजप सरकारातील एसटी आमदारांनाही टार्गेट करण्यात आले. विधानसभेत ‘एसटीं’ना आरक्षण मिळावे, यासाठी विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगस, युरी आलेमाव हे आवाज उठवतात.

मात्र, आमचे एसटी आमदार मूग गिळून गप्प बसतात, ही दुर्दैवी बाब आहे. यासाठीच आम्हाला आमचे स्वत:चे आमदार निवडून आणायचे आहेत, जे आमच्या मागण्या विधानसभेत मांडतील, असे शिरोडकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

भाजप सरकारात ‘एसटी’चे चार आमदार असताना आदिवासी कल्याण खाते मुख्यमंत्र्यांकडे का, असा प्रश्‍न रूपेश वेळीप यांनी केला.

मंगेश, दिलीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन कार्यक्रम झाले; पण आदिवासी कल्याण मंत्री या नात्याने सावंत एकाही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, असेही वेळीप यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com