Khalistan Protest: खलिस्तान समर्थकांचा लंडनमध्ये राडा, तिरंग्याचाही केला अपमान

खलिस्तान समर्थकांनी तिरंगा खाली उतरवला. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांनी ही माहिती दिली असून त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.
Khalistan Protest at High Commission of India, London
Khalistan Protest at High Commission of India, LondonDainik Gomantak
Published on
Updated on

Khalistan Protest at High Commission of India, London: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी पंजाब पोलिस सर्च ऑपरेशन करत असून, राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर लंडनमध्ये देखील खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ घालत राष्ट्रध्वजाचाही अपमान केला.

खलिस्तान समर्थकांनी तिरंगा खाली उतरवला. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांनी ही माहिती दिली असून त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत माहिती दिली आहे. "लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारात आज झालेल्या या लज्जास्पद कृत्यांचा मी निषेध करतो.

हे कृत्य पूर्णपणे अस्वीकार्य आहे. नवी सर्वात ज्येष्ठ ब्रिटीश डिप्लोमॅट यांना तातडीने दिल्लीत बोलाविण्यात आले आहे."

Khalistan Protest at High Commission of India, London
Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपालच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन, पंजाबमध्ये हाय अलर्ट

परराष्ट्र कार्यालयाने ब्रिटीश सुरक्षेच्या अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. या घटकांना उच्चायुक्तालयाच्या आवारात प्रवेश कसा दिला गेला, अशी विचारणा परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

यूकेमधील भारतीय राजनैतिक परिसर आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत यूके सरकारची उदासीनता भारताला अस्वीकार्य असल्याचे, भारताने म्हटले आहे.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग व्यसनमुक्ती केंद्रे आणि गुरुद्वाराचा वापर शस्त्रे साठवण्यासाठी आणि तरुणांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार करण्यासाठी करत होता.

अशी माहिती समोर आली आहे. अमृतपाल सिंग गेल्या वर्षी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि परदेशात राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांच्या सांगण्यावरून दुबईहून भारतात परतला होता.

दरम्यान, अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी पंजाब पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. राज्यात हाय अलर्ट जारी केला असून, इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. अमृतपालच्या अनेक साथिदार आणि जवळच्या लोकांची पोलिस सध्या धरपकड करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com