Laxmikant Parsekar, Pramod Sawant and Digambar Kamat
Laxmikant Parsekar, Pramod Sawant and Digambar Kamat Dainik Gomantak

गोव्याच्या बारा मुख्यमंत्र्यांचा आज होणार सन्मान

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई उपस्थित राहणार आहेत.
Published on

पणजी : 35 व्या घटकराज्य दिनानिमित्त 30 मे रोजी राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सरकारचा मुख्य शासकीय कार्यक्रम राजभवनवरील दरबार हॉलमध्ये सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय पर्यटन, संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांची उपस्थिती असेल. (Twelve Chief Minister's of Goa to be felicitated today)

Laxmikant Parsekar, Pramod Sawant and Digambar Kamat
गोमेकॉ वसतिगृहाच्या ‘वॉर्डन’वर निष्काळजीपणाचा ठपका

राज्याच्या नावलौकिकात भर टाकलेल्या 35 मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत 13 मुख्यमंत्री झाले असून विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ते या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत. यापूर्वीच्या 12 मुख्यमंत्र्यांपैकी 7 मुख्यमंत्री प्रत्यक्ष हजर राहून सन्मान स्वीकार आहेत. यामध्ये चर्चिल आलेमाव, रवी नाईक, लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा समावेश आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर, लुईस प्रोत बार्बोसा, डॉ. विल्फ्रेड डिसोझा आणि मनोहर पर्रीकर यांच्या वतीने त्यांचे नातेवाईक हा सन्मान स्वीकारतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com