Goa DGP: 'मोदीजी' उल्लेखावरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना गोवा पोलिस महासंचालकांनी दिले सडेतोड उत्तर

Goa DGP Viral Tweet: संसद आपल्या सर्वांची आहे. पण, कायद्याचे निर्णय सत्तेत असलेल्या पक्षाचे सरकार घेत असते.
कोणी केले तुम्हाला DGP? UPSC कसे पास झाले? गोव्याचे पोलिस महासंचालक एका ट्विटमुळे ट्रोल
Goa DGP Viral TweetDainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव येथील घराची मोडतोड केल्याप्रकरणी होत असलेल्या टीकेवरुन आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गोव्याचे पोलिस महासंचालकांना एका ट्विटवरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांनी केला.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी एक जुलैपासून नव्याने लागू होणाऱ्या कायद्यांबाबत एक एक्सवरती ट्विट केल, यावरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनी पोलिस महासंचालकांनी सडेतोड उत्तर दिले.

एक जुलैपासून भारत गुन्हेगारी संबधित कायद्यांबाबत नव्या युगात प्रवेश करत आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय संसदेने लागू केलेले नवीन कायदे लागू होणार आहेत. गोव्यातील पोलीस स्थानकांमध्ये या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. तुमच्या मुलांना या बदलाबाबत माहिती द्या, असे ट्विट जसपाल सिंग यांनी केले.

यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जसपाल सिंग यांनी मोदीजी असा केलेल्या उल्लेखावर सवाल उपस्थित करत संसद मोदींच्या नेतृत्वाखाली कधी गेली असे विचारत डिजीपींना ट्विट एडिट करण्याची गरज व्यक्त केली.

'संसदेने कायद्याला मंजुरी दिली पण एखादा कायदा संसदेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडाळात मांडला जातो,' असे उत्तर जसपाल सिंग यांनी दिले.

कोणी केले तुम्हाला DGP? UPSC कसे पास झाले? गोव्याचे पोलिस महासंचालक एका ट्विटमुळे ट्रोल
Agonda Canacona: आगोंद येथे दोन शॅक्स जळून खाक, बिहारच्या सुताराचा जळून मृत्यू

देशातील प्राशासकीय अधिकाऱ्यांचा पगार नरेंद्र मोदींच्या खिशातून दिला जातो असे दिसते. यांचे पगार भाजप कार्यालयातून येत नाही, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली.

यावर जसपाल यांनी तुम्ही चुकीचा अर्थ घेतला. संसद आपल्या सर्वांची आहे. पण, कायद्याचे निर्णय सत्तेत असलेल्या पक्षाचे सरकार घेत असते. आणि तीन कायदे सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संसदेत मांडण्यात आले, असे उत्तर जसपाल सिंग यांनी दिले.

पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय संसदेने नवीन कायदे लागू केले... अशी खोचक प्रतिक्रिया देणाऱ्या एका युझरला जसपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जुने कायदे मोडून नवे कायदे करणे हे चांगली बाब आहे. नक्कीच संसद आपल्या सर्वांची आहे. पण, त्यावेळचे नेते याबाबत निर्णय घेत असतात, असे उत्तर दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com