Agonda Canacona: आगोंद येथे दोन शॅक्स जळून खाक, बिहारच्या सुताराचा जळून मृत्यू

Two Shacks Gutted In Fire At Agonda: विशेष म्हणजे संपूर्ण धवळखाजन अग्निशमन दलाच्या जवानांमुळेच वाचले.
आगोंद येथे दोन शॅक्स जळून खाक, राजस्थाच्या सुताराचा जळून मृत्यू
Two Shacks Gutted In Fire At Agonda Beach CanacaonaDainik Gomantak

धवळखाजन-आगोंद येथे काल मंगळवारी उत्तररात्री लागलेल्या आगीत 'सोल्मेट' व 'ओमकार' असे दोन शॅक्स तसेच सात कुटिरे जळून भस्मसात झाली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

'सोल्मेट' रॉक्समध्ये बिहारच्या सुताराचा होरपळून जळालेला मृतदेह आढळला. काणकोण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मडगाव इस्पितळात पाठवून दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग इतकी भयंकर होती की त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला पाण्याचे आठ बंब वापरण्यात आले.

विशेष म्हणजे संपूर्ण धवळखाजन अग्निशमन दलाच्या जवानांमुळेच वाचले, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या दुर्घटनेतून बचावलेल्या सात जणांची जबानी घेण्याचे काम काणकोण पोलिसांनी सुरू केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com