Tuyem News: तुये पंचायत क्षेत्रातील डॉन बॉस्को हायस्कूलच्या मागे व इतरत्र असलेल्या उघड्या चिरे खाणीत बायोमेडिकल कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी तक्रार तुयेवासीयांनी प्रदूषण महामंडळ आणि पंचायतीकडे केली होती.
Tuye GoaDainik Gomantak

Tuyem: तुयेत लोकांच्या आरोग्याशी खेळ! उघड्यावर टाकला बायोमेडिकल कचरा; त्वरित कारवाईची मागणी

Tuyem News: तुये पंचायत क्षेत्रातील डॉन बॉस्को हायस्कूलच्या मागे व इतरत्र असलेल्या उघड्या चिरे खाणीत बायोमेडिकल कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी तक्रार तुयेवासीयांनी प्रदूषण महामंडळ आणि पंचायतीकडे केली होती.
Published on

Open Quarry in Tuyem Panchayat Filled with Hazardous Medical Waste

मोरजी: तुये पंचायत क्षेत्रातील डॉन बॉस्को हायस्कूलच्या मागे व इतरत्र असलेल्या उघड्या चिरे खाणीत बायोमेडिकल कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी तक्रार तुयेवासीयांनी प्रदूषण महामंडळ आणि पंचायतीकडे केली होती. त्यानुसार पंचायत मंडळ, नागरिक आणि प्रदूषण मंडळ व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची आज पाहणी केली आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

तुये पंचायत क्षेत्रातील ज्या उघड्या चिरेखाणी आहेत. त्या चिरेखणींमध्ये भराव घालून त्या बुजवण्याची जबाबदारी कचरा व्यवस्थापकीय मंडळाकडे सरकारने दिली आहे. त्यानुसार कचरा व्यवस्थापन मंडळ या खाणी बुजवण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु हल्ली मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल कचरा या चिरेखाणींमध्ये आणि परिसरात टाकला जातो.

अशा प्रकारची तक्रार तुयेवासीयांनी तुये पंचायत आणि गोवा प्रदूषण महामंडळाकडे केली होती. त्यानुसार या परिसरात ज्या ज्या ठिकाणी बायोमेडिकलचा कचरा टाकला जातो. त्याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. ही पाहणी केल्यानंतर पुढील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु तुये पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांनी हा कचरा त्वरित उचलावा, अशी मागणी केली.

Tuyem News: तुये पंचायत क्षेत्रातील डॉन बॉस्को हायस्कूलच्या मागे व इतरत्र असलेल्या उघड्या चिरे खाणीत बायोमेडिकल कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी तक्रार तुयेवासीयांनी प्रदूषण महामंडळ आणि पंचायतीकडे केली होती.
Reis Magos: 'रेईश मागूश' बाबतीत थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार; बांधकामांसाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

रोगराईची भीती

डोंगर माळरानावर किंवा ज्या परिसरात चिरेखाणी आहेत, त्या चिरे खाणींच्या परिसरात पाण्याचे स्रोत आहेत. त्यांचा वापर शेतकरी शेतीबागायती किंवा दैनंदिन कामासाठी करत असतात. हा बायोमेडिकल कचरा त्या परिसरात टाकल्यामुळे भविष्यात पाण्याद्वारे रोगराई होऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com