Tuyem Hospital: 9 वर्षे झाली, तरीही हॉस्पिटल सुरू न होणे गंभीर! तुये इस्पितळ प्रश्नावर आंदोलन कायम; आंदोलक काढणार मशाल मिरवणूक

Tuyem hospital protest: मागण्या मान्य न झाल्यास येत्या १५ जानेवारी रोजी मशाल मिरवणूक काढण्यात येईल, असा पुनरुच्चार आंदोलकांनी केला.
Tuyem hospital protest
Tuyem hospital protestDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: तुये येथे इस्पितळासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित इस्पितळ तातडीने सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी तुये इस्पितळ कृती समितीतर्फे सुरू करण्यात आलेले सामूहिक साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू होते.

मागण्या मान्य न झाल्यास येत्या १५ जानेवारी रोजी मशाल मिरवणूक काढण्यात येईल, असा पुनरुच्चार आंदोलकांनी केला.

इमारत बांधून अनेक वर्षे उलटूनही इस्पितळ सुरू न झाल्याबाबत बोलताना आगरवाडा–चोपडे नागरिक समितीचे अध्यक्ष विवेक गावकर म्हणाले की, माझे वडील खेमराज गावकर हे स्वातंत्रसैनिक होते. गोवा मुक्तिलढ्यात सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. आज मुक्त गोव्यात इस्पितळासारख्या मूलभूत सुविधांसाठी आम्हालाच निवडून दिलेल्या सरकारविरुद्ध आंदोलन करावे लागत आहे, ही लोकशाहीतील शोकांतिका आहे.

कृती समितीचे सदस्य देवेंद्र प्रभू देसाई म्हणाले की, राज्यात अनेक प्रकल्पांना लोकांचा विरोध होत असताना, येथे मात्र इस्पितळ सुरू व्हावे म्हणून गेली अनेक वर्षे जनजागृती, जाहीर सभा आणि ग्रामपंचायतींमधून ठराव करून मागणी केली जात आहे.

तरीही सरकार इस्पितळासारख्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करत आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न इस्पितळाची इमारत पूर्ण होऊन तब्बल नऊ वर्षे झाली, तरीही इस्पितळ सुरू न होणे ही गंभीर बाब आहे.

Tuyem hospital protest
Tuyem Hospital: '100 कोटी खर्चून बांधलेले हॉस्पिटल का सुरु नाही'? पेडण्‍यात उद्रेक; तुये इस्पितळ कृती समितीचे साखळी उपोषण

मिशन फॉर लोकलचे निमंत्रक राजन कोरगावकर म्हणाले की, या इस्पितळाचा लाभ पेडणे तालुक्यासह शेजारील तालुके व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होणार असून सरकारने केवळ आश्वासने न देता ती प्रत्यक्षात उतरवावीत. लवकरात लवकर जनतेसाठी हे इस्पितळ खुले करावे, सर्व सेवा उपलब्ध कराव्यात, अशी जनतेची मागणी आहे.

Tuyem hospital protest
Tuyem Pernem: ..आनंदाची बातमी द्यायला चालले आणि गमावला जीव! तुये-पेडणेतील दुःखद घटना; गुरांना वाचवण्याचा नादात अपघाती मृत्‍यू

सरकारचे अपयश!

मांद्रे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर यांनी तुये इस्पितळ कृती समितीच्या मागणीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. तसेच गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांनी, इस्पितळासाठी उभारलेल्या इमारतीत सेवा सुरू करण्यासाठी नागरिकांना गेली दोन-अडीच वर्षे आंदोलन करावे लागत आहे, हे सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याची टीका केली. मांद्रेचे माजी सरपंच व विद्यमान पंचायत सदस्य प्रशांत ऊर्फ बाळा नाईक यांनीही सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांत टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com