Turtle Centre, Pedne: कासव केंद्रातील पाच कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; तडकाफडकी केली कमी

Pernum/Pedne Turtle Centre News in Marathi: कासव संवर्धनात बजावली होती महत्त्वाची कामगिरी
Turtle Centre
Turtle Centre Dainik Gomantak
Published on
Updated on

Turtle Centre in Morjim, Pedne :

पेडणे, मोरजी किनाऱ्यावरील वन विभागाच्या नेचर इंटरप्रिटेशन सेंटर या कासव संवर्धन केंद्रात यंदा प्रथमच जास्त अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची संख्या वाढविण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या पाच कर्मचाऱ्यांना तडकाफडकी सेवेतून कमी केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

पेडणे तालुक्यातील मोरजी, मांद्रे, हरमल-केरी या किनाऱ्यावर कासवांनी घातलेली अंडी आणून मोरजीतील नेचर इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये ठेवली जातात. या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना रोजंदारीवर नोकरीसाठी घेतले होते.

Turtle Centre
Goa Congress: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरिएतो यांच्या भेटीगाठी सुरू

त्यात ट्रॅकर, रेस्क्यूअर, वॉचमन, तसेच केरकचरा गोळा करणारे असे १९ कामगार घेतले होते. कासव अंडी घालण्याचा हंगाम मे महिन्यापर्यंत असताना मोरजी केंद्रातील वनरक्षक शिवानंद गावस यांनी या कर्मचाऱ्यांना २० मार्चपासून तुमचा करार संपलेला आहे, असे सांगितले. यापुढे नोकरी करायची इच्छा असेल तर राऊंड फॉरेस्टर संयोग पेडणेकर यांना कांपाल-पणजी येथे भेटा, असेही सांगितले.

कासव आगमनाचा उच्चांक

गेल्या वर्षी ७० कासव अंडी देण्यासाठी आले होते, यंदा या सर्व कामगारांनी रात्र-दिवस काम करून चांगली सेवा दिल्यामुळे या हंगामात १९२ कासव अंडी देण्यासाठी किनाऱ्यावर आले.

किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या कासवांचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी या केंद्राला फेब्रुवारी महिन्यात भेट दिली असता, अंडी देण्यासाठी आलेल्या कासवांची संख्या पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले होते.

Turtle Centre
Goa Congress: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरिएतो यांच्या भेटीगाठी सुरू

पावसाळ्यात मृत कासव किंवा डॉल्फिनसारखे जलचर किनाऱ्यावर लागल्यावर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी या अशा कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असते. असे असताना हंगाम संपल्याने कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचे कारण पुढे करण्यात काहीच तथ्य नाही.

-उदय मांद्रेकर, पंचसदस्य, तुये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com