Goa PSI Recruitment scam: शाहांच्या खात्याने दिला दणका; 15 दिवसात अहवाल सादर करा, DGP ना आदेश

शारीरिक चाचणीत दोघेजण नापास होऊनही त्यांना पास केल्याचा आरोप
Goa PSI Recruitment scam
Goa PSI Recruitment scamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa PSI Recruitment scam: गोव्यात उपनिरीक्षक भरती करताना मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला असल्याची तक्रार गोवा फॉरवर्ड पक्षाने केली होती. त्याची केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेतली असून या तक्रारींची सखोल चौकशी करावी अशी सूचना गोवा सरकारच्या सार्वजनिक तक्रार नियंत्रण खात्याला केली आहे.

सार्वजनिक तक्रार नियंत्रण खात्याने पोलीस महासंचालक तसेच दक्षता विभागाकडे ही तक्रार पाठवून या संदर्भातील चौकशीचा अहवाल 15 दिवसात सादर करा, असा आदेश दिला आहे.

Goa PSI Recruitment scam
कुटुंबाला न सांगता गोव्यात आलेल्या प्रेमीयुगूलाचा मृत्यू, पोस्टमार्टमनंतर समोर आली धक्कादायक माहिती

गोव्यात उपनिरिक्षक भरती करताना शारीरिक चाचणीत दोघेजण नापास होऊनही त्यांना पास करण्यात आले होते त्याशिवाय आणखी सहा जण जे पोलीस शिपायांसाठी घेतलेल्या परीक्षेत नापास झाले तेच दुसऱ्या दिवशी उपनिरिक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाले होते.

या संदर्भात गोवा सरकारकडे गोवा फॉरवर्ड पक्षाने केलेल्या तक्रारींची दखल न घेतल्याने शेवटी सरदेसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांना पत्र लिहिले होते.

आमच्या तक्रारीची गृहमंत्री अमीत शहा यांनी दखल घेतल्याने मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या आदेशानुसार आता चौकशी होणार आहे मात्र ही चौकशी डोळ्यांना पाणी लावण्यापुरती असू नये अशी अपेक्षा या संबंधी प्रतिक्रीया देताना सरदेसाई यांनी व्यक्त केली.

Goa PSI Recruitment scam
Mapusa Crime News: धक्कादायक! म्हापशात शिक्षकाकडून अनेक विद्यार्थिनींचा विनयभंग

शारीरिक चाचणीत दोघे फेल झाले त्याचा आमच्याकडे व्हिडिओ पुरावा आहे. आम्ही तो सादर केल्यावर या कथीत घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली मात्र या समितीने काय अहवाल दिला याची माहिती मागितल्यास सरकार ती द्यायला तयार नाही.

आरटीआय खालीही माहिती देण्यात येत नाही. विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न मांडला असता त्यावेळीं अधिवेशनच लहान करण्यात आले. या कारस्थानात स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत सामील आहेत की नाही हे माहीत नाही पण तेही या चौकशीत रस दाखवीत नाहीत. या पार्श्वभूमीवर ही नवी चौकशी नुसता फार्स होऊ नये अशी अपेक्षा सरदेसाई यांनी व्यकत केली.

यापूर्वी अशाच प्रकारचा घोटाळा कर्नाटक राज्यात झाला आणि त्या राज्याने चौकशी करून दोषींना तुरुंगात टाकले. गो तसेच करण्याची गरज आहे. अन्यथा या बाबतीतही आम्ही कर्नाटकच्या मागेच असे होऊ नये असा मार्मिक टोलाही त्यांनी हाणला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com