ही तर ‘सायलेन्सिंग इन्व्हेस्टिगेटिंग टीम’ : ट्रोजन डिमेलो

जमीन घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसची टीका
Trojan Demello
Trojan DemelloDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जमीन घोटाळाप्रकरणी राज्‍य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकासंदर्भात अटी जाहीर करण्यात अपयश आल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री लोकशाही संस्थांना दडपण्यासाठी न्यायालयीन व्यवस्थेचा गैरवापर करत आहे. सरकारने स्‍थापन केलेली एसआयटी म्‍हणजे ‘सायलेन्सिंग इन्व्हेस्टिगेटिंग टीम’ आहे, असा आरोपही त्‍यांनी यावेळी केला. पक्षाच्‍या कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Trojan Demello
म्हापशात रातोरात उभारला बेकायदा गाडा

पंचायत निवडणुका तातडीने घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने देऊनही राज्‍य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. लोकशाही संस्था आणि प्रक्रिया दडपण्याच्या उद्देशाने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन अवमानाची शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित असूनही, न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे.

न्यायालयीन व्यवस्थेचे पालन आणि आदर करण्यात सरकारला अपयश आल्‍याचे ट्रोजन म्हणाले.तपास सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी असमर्थता दर्शविल्याबद्दल ट्रोजन यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. आम्ही जलदगती न्यायालयाची मागणी केली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जलदगती तपासाची खात्री दिली होती, असेही ट्रोजन म्हणाले.

विरोधकांना नामोहरम करण्याची खेळी

सध्याची एसआयटी कट-कारस्थानात गुंतली आहे. लोकांना गप्प बसविण्यासाठी आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी एसआयटीचा वापर केला जात आहे. सरकारने एसआयटीसंदर्भात अटी जाहीर केलेल्या नाहीत किंवा पथकाचे संख्याबळ २२ पर्यंत वाढवलेले नाही. या प्रकरणात भाजपचे नेते आणि मंत्री गुंतले असल्याने एकही कोमुनिदाद प्रकरण निकाली निघालेले नाही, असा आरोप त्‍यांनी केला.

राजकीय दलालांना वाचवण्यासाठी एजन्सी

सरकार एसआयटीच्‍या माध्यमातून राजकीय दलालांना वाचविण्यासाठी आणि लोकांना फसवण्यासाठी मदत करत आहे. आम्ही सीबीआय, ईडी आणि आयटी एजन्सीबद्दल ऐकले आहे. आता राज्‍य सरकारने एसआयटीच्या माध्यमातून मंत्री आणि विरोधकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन एजन्सी सुरू केली आहे, अशी टीका ट्रोजन यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Pollution Control Board report
Narendra Sawaikar Post Controversy
Salman Khan Goa project news
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com