Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Tripti Dimri in Goa: ती एकटी नसून तिचा कथित बॉयफ्रेंडसॅम मर्चंट तिच्यासोबत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरून स्पष्ट झालं आहे
Tripti Dimri in Goa Trip
Tripti Dimri in Goa Trip Dainik Gomantak
Published on
Updated on

Tripti Dimri Viral Photos: ॲनिमल चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. कामातून वेळ काढून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे तिला आवडते आणि आता ती गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली आहे. विशेष म्हणजे, ती एकटी नसून तिचा कथित बॉयफ्रेंडसॅम मर्चंट तिच्यासोबत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरून स्पष्ट झालं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले गोवा ट्रिपचे फोटो

तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गोव्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने सॅमला टॅग केल्याने, त्यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या दोघांनी एकाच ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या अकाउंटवरून शेअर केले आहेत. इतकंच नाही, तर एकमेकांच्या इंस्टाग्राम स्टोरीजही त्यांनी रिपोस्ट केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसते.

गोव्यामध्ये तृप्ती विविध ठिकाणी फिरताना आणि तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. तिने पाणीपुरी आणि भेळपुरीवर ताव मारल्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.

Tripti Dimri Goa
Tripti Dimri GoaDainik Gomantak

कोण आहे सॅम मर्चंट?

तृप्तीचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंट हा एक मॉडेल आहे. मॉडलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी तो हॉटेल व्यवसायात सक्रिय होता. सॅम अनेकदा तृप्तीच्या कामासाठी तिचे कौतुक करताना दिसतो. अलीकडेच, स्पिरीट या चित्रपटात तृप्तीची वर्णी लागल्यानंतर त्याने सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

Tripti Dimri in Goa Trip
Tripti Dimri In Goa: गोव्याच्या बिझनेसमॅनबरोबर 'ॲनिमल' गर्ल तृप्ती डिमरी करतेय सुट्ट्या एन्जॉय; पाहा फोटो

फिनलँडनंतर गोवा ट्रिप

सॅम आणि तृप्ती गोव्यात पहिल्यांदाच एकत्र फिरायला गेले नाहीत. यापूर्वीही ते फिनलँडमध्ये एकत्र दिसले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळाले होते. ॲनिमल चित्रपटानंतर तृप्तीची लोकप्रियता खूप वाढली आहे. तिच्या व्यावसायिक यशासोबतच आता तिच्या खासगी आयुष्यातील या नव्या घडामोडींमुळे ती चाहत्यांच्या आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com