Tripti Dimri In Goa: गोव्याच्या बिझनेसमॅनबरोबर 'ॲनिमल' गर्ल तृप्ती डिमरी करतेय सुट्ट्या एन्जॉय; पाहा फोटो

Animal Star Tripti Dimri In Goa: 'ॲनिमल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या तृप्ती डिमरीने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून छाप सोडली होती.
Animal Star Tripti Dimri In Goa
Animal Star Tripti Dimri In GoaDainik Gomantak

Animal Star Tripti Dimri In Goa:

'ॲनिमल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या तृप्ती डिमरीने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून छाप सोडली होती. ती तिच्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. यातच आता, तृप्ती डिमरी कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक कियारा अडवाणीबरोबर दिसला होता. त्याचा हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.

आता या चित्रपटाचा पुढचा पार्ट 'भूल भुलैया 3' येत आहे. कार्तिक या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मात्र, या चित्रपटात त्याची हिरॉइन कियारा नसून ॲनिमल गर्ल तृप्ती डिमरी असणार आहे. नुकतेच तृप्तीने या चित्रपटाचे आपले शेड्यूल पूर्ण केले आहे. शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर कलाकारांनी एक फोटो शेअर केला होता. दरम्यान, तृप्ती सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सुंदर फोटो शेअर केले आहेत. ती सध्या गोव्यात (Goa) आहे. तृप्तीने हॉलिडे मोडमधील स्वतःचे फोटो शेअर केले. तिचा हा खास अंदाज पाहून चाहतेही खूश झाले आहेत.

Animal Star Triptii Dimri In Goa
Animal Star Triptii Dimri In GoaDainik Gomantak
Animal Star Tripti Dimri In Goa
Goa Shigmotsav 2024: डिचोलीत मुलांसह महिलांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तृप्तीला सॅम मर्चंटसोबत एका किराणा दुकानाबाहेर स्पॉट करण्यात आले होते. पापाराझींनी त्या दोघांचे फोटो क्लिक केले होते. या दोघांनी आपल्या मित्रांसोबत एकत्र होळीही साजरी केली. तिने या होळी सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. सॅम जो आधी मॉडेल होता तो आता बिझनेसमन आहे. तो गोव्यातील साखळी येथील लक्झरी हॉटेल्सचा मालक आहे.

दुसरकीडे, तृप्ती डिमरी सध्या 'भूल भुलैया 3' चित्रपटात कार्तिक व्यतिरिक्त विद्या बालनसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर अपकमिंग प्रोजेक्टमध्ये तृप्ती विकी कौशल आणि एमी विर्कसोबत दिसणार आहे. त्यांचा हा चित्रपट 19 जुलैला रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com