'गोव्यात तृणमुल कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही'

इतर पक्षातील आमदार आमच्या पक्षात येत असतील तर त्यांना पक्षाचे दरवाजे खुले असतील असे स्पष्टीकरण तृणमुलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझींन फालेरो (Luizinn Falero) यांनी दिले.
Luizinn Falero
Luizinn FaleroDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: गोव्यात (Goa) तृणमुल आणि गोवा फॉरवर्ड पक्षात (Goa Forward Party) युती होणार अशी राजकीय चर्चा चालू असताना तृणमुल कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही, मात्र इतर पक्षातील आमदार आमच्या पक्षात येत असतील तर त्यांना पक्षाचे दरवाजे खुले असतील असे स्पष्टीकरण तृणमुलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझींन फालेरो (Luizinn Falero) यांनी दिले.

आज नावेलीच्या काँग्रेस गट समितीच्या सदस्यांनी तृणमुल पक्षात प्रवेश केला. यावेळी वेळ्ळीच्या माजी आमदार फेरल फुर्तादो यांनीही तृणमुल पक्षात प्रवेश केला. काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष काँसेसाव पिशॉट, लियॉन रायकर, काँग्रेस युवा समितीचे गट अध्यक्ष रोडनी कुटीन्हो तसेच अन्य कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. भाजपशी थेट लढत देण्याची ताकद फक्त तृणमुल काँग्रेस मध्येच आहे. त्यासाठी सर्व गोवेकारांनी पक्षभेद विसरून तृणमुलच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन फालेरो यांनी केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फालेरो यांनी, गोव्यात 40 सही मतदारसंघात तृणमुल आपले उमेदवार उभे करणार असल्याने कुणाशीही युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र हे उमेदवार आकाशातून येणार नाहीत. जे कोण गोव्यात उमेदवार उपलब्ध आहेत त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे सूचक उद्गार त्यांनी काढले.

Luizinn Falero
Goa: ‘दाबोळी’ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद झाल्यास पर्यटन व्यवसायाला फटका

आम्ही उमेदवार शोधून काढण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यासाठी तृणमुल कार्यकारिणी बरोबरच आय पॅकची यंत्रणा कार्यरत आहे. सध्याच्या भाजप सरकारवर आम्ही लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहोत, आणि लोकांभिमुख असा जाहीरनामाही प्रसिद्ध करणार असे त्यांनी सांगितले. हेही काम सुरू झाले आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी गोवा सध्या आर्थिक संकटात असून धार्मिक शक्ती तोंड वर काढू लागल्या आहेत अशा परिस्थितीत फालेरो यांनी पुन्हा नावेलीतून निवडणूक लढवावी अशी मागणी यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. मात्र यावर आपल्या नेहमीच्या शैलीत काहीच स्पष्टीकरण न देता फालेरो म्हणाले, मी यावेळी राजकारणातून निवृत्त होण्याचे ठरविले होते मात्र सध्या गोवा आणि गोवेकर त्रासात पडलेले असताना मी निवृत्ती स्वीकारू शकत नाही. गोव्यासाठी माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढेन असे सूचक उद्गार काढले.

Luizinn Falero
Goa Assembly: सांताक्रुझमध्ये 65 कोटींची कामे पूर्ण: निलेश काब्राल

यावेळी बोलताना माजी आमदार फेरल फुर्तादो यांनी लुईझींन फालेरो मुख्यमंत्री होणार म्हणून काँग्रेस मधील काही नेते त्यांचे पाय ओढू पाहत होते असा आरोप करून अशा कृतीमुळेच गोव्यात काँग्रेस संपली असा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com