वन खात्याकडून राज्यात वृक्षगणना सुरू

130 पथके कार्यरत; मोजणीसाठी तालुकावार तुकड्यांची स्थापना
Tree Counting in Goa by Forest Department
Tree Counting in Goa by Forest DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : हल्लीच झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यातील वृक्षगणना करण्याचा निर्णय झाला. या वृक्षगणनेसाठी तालुकावार तुकड्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवडाभरात सरकारी वनक्षेत्र असलेल्या जमिनीत सुमारे 56,253 वृक्षांची गणना करण्यात असून सुमारे 130 पथके कार्यरत असल्याची माहिती वन खात्यातर्फे लिव्हिंग हेरिटेज फाऊंडेशनच्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी आज दिली.

Tree Counting in Goa by Forest Department
काँग्रेसला ब्लॅकमेल करण्यासाठीच प्रशांत किशोर गोव्यात; किरण कांदोळकर यांचा आरोप

न्यायालयाने 8 जुलै 2021 रोजी दिलेल्या निवाड्यात राज्यातील वृक्षगणना करण्याचे निर्देश देऊन त्याचा उत्तर आणि दक्षिण गोवा वृक्ष प्राधिकरणाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ते सादर न केल्याने याचिकादाराने ही याचिका सादर केली आहे. मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने वन खात्याला यासंदर्भात माहिती देण्याचे निर्देश दिले होते. वृक्ष संरक्षण निधी हे खाते सुरू करण्यात आले आहे. त्या बँक खात्याची माहिती खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. त्यासाठीचा निधीही जमा करण्यात आला आहे. जिल्हा वृक्ष प्राधिकरणाच्या दोन्ही सदस्य सचिवांनी परिपत्रक काढून संबंधित अधिकाऱ्यांना वृक्षगणनेसंदर्भात निर्देश दिले आहेत.

खंडपीठाने निर्देश दिल्यानंतर वन खात्याबरोबर वृक्ष प्राधिकरणाचीही बैठक झाली. बैठकीत वृक्षगणना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी जोपर्यंत एजन्सीची नेमणूक होत नाही, तोपर्यंत मुख्य वनपाल आणि वनपाल यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्याच्या अधिकाऱ्यांची तालुकावार नेमणूक करण्याचे ठरले.

Tree Counting in Goa by Forest Department
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ‘स्टार्टअप’शी साधला संवाद

उप वनसंवर्धन किंवा साहाय्यक वनसंवर्धन अधिकाऱ्यांना तालुका तुकडी प्रमुख म्हणून नेमून त्यांना प्रत्येकी दहापेक्षा अधिक पथके देण्याचे ठरविण्यात आले. आतापर्यंत 130 पथके नियुक्त केली असून वृक्षगणना राज्यात सुरू झाली आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने या पथकांची संख्या वाढविली जाईल व हे काम खासगी एजन्सीकडे सोपवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

तांत्रिक समितीने कोणत्या प्रकारची आणि जातीची झाडे कोणत्या क्षेत्रात लावावीत, याचे परिपत्रक दिले आहे. त्यानुसार त्या त्या वन क्षेत्रात झाडे लावली जाणार आहेत. गेल्या चार वर्षांत (2018 ते 2022) 8,046 अर्ज झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी अर्ज आले होते. त्यामध्ये 1 लाख 43 हजार 603 झाडांचा समावेश होता. त्यापैकी 1 लाख 5 हजार 565 झाडे ताेडण्यास परवानगी दिली. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात 5 लाख 9,435 झाडे लावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com