गोव्यात इलाज करुन नेपाळला परत निघालेल्या दोन वर्षीय मुलीचा रस्त्यातच मृत्यू झाला. मध्य प्रदेश येथील सोनकच येथून जाणाऱ्या इंदूर-भोपाळ महामार्गावरील कालीसिंध नदीच्या पुलाजवळ ही घटना उघडकीस आली. 2 वर्षीय मुलीवर गोव्यात उपचार केल्यानंतर कुटुंबीय तिला घेऊन परत नेपाळला जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, देब बहादूर विश्वकर्मा काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन वर्षीय मुलीवर उपचार करण्यासाठी गोव्यात आले होते. उपचार केल्यानंतर मुलीला घेऊन ते नेपाळला माघारी जात होते. मध्य प्रदेश येथील सोनकच येथून बसद्वारे जात असताना त्यांच्या लहानग्या बाळाला वाटेतच दम तोडला.
अचानक ओढवलेल्या प्रसंगाने मुलीचे कुटुंबीय चांगलेच हळहळले. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या दुकानदारांनी नगरच्या जय हिंद सेवा समितीला माहिती दिली. समिती सदस्यांसह इतरांनी घटनास्थळ गाठून कुटुंबीयांशी चर्चा केली.
सोनकच्छमध्ये मुलीवर अंतिम संस्कार करण्याची इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यानंतर कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. कालीसिंध नदीजवळ मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बसमधील प्रवाशांसह अन्य लोकांनी दोन मिनिटे मौन पाळून मुलीला श्रद्धांजली वाहिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.