Goa Mini Sunburn: मिनी सनबर्नवरुन फळदेसाईंचा यु-टर्न; सरदेसाई म्हणाले, 'ओल्ड गोवा तर धार्मिक स्थळ'

MLA Rajesh Phaldesai: मिनी सनबर्नवरुन प्रतिक्रिया समोर आल्यानंतर फळदेसाईं यांनी त्यांच्या भूमिकेवरुन यु-टर्न घेतला आहे.
Goa Mini Sunburn: मिनी सनबर्नवरुन फळदेसाईंचा यु-टर्न; सरदेसाई म्हणाले, 'ओल्ड गोवा तर धार्मिक स्थळ'
BJP MLA Rajesh FaldessaiDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण गोव्यात आयोजनावरुन वाद सुरु असताना ओल्ड ओल्ड गोव्यात मिनी सनबर्न आयोजित करण्याचे भाष्य कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाईंनी गेल्या आठवड्यात केले होते. यावरुन आता फळदेसाईंनी यु-टर्न घेतला असून, आमका नाका सनबर्न अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आमदार फळदेसाईंनी ओल्ड गोव्यात मिनी सनबर्न आयोजित करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. दक्षिण गोव्यातील सनबर्न वाढता विरोध पाहता त्यांनी सनबर्नबाबत भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन देखील प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या भूमिकेवरुन यु-टर्न घेतला आहे.

सनबर्न आणा असे आम्ही म्हटले नाही, आता ओल्ड गोव्यात सेंट झेवियर यांचे एक्सपोझिशन असल्याने आमका नाका सनबर्न, असे फळदेसाई म्हणाले. सनबर्नसाठी मोठी जागा लागते तेवढी जागा देखील आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे फळदेसाई म्हणाले.

Goa Mini Sunburn: मिनी सनबर्नवरुन फळदेसाईंचा यु-टर्न; सरदेसाई म्हणाले, 'ओल्ड गोवा तर धार्मिक स्थळ'
Goa Assembly Monsoon Session: लक्षवेधीवरुन विरोधक सभापतींच्या हौदात, दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामकाज तहकूब

ओल्ड गोवा तर धार्मिक स्थळ - विजय सरदेसाई

ओल्ड गोव्यातील सनबर्न म्हणजे टुमारो लँड इन वॅटीकन सिटी आहे. ओल्ड गोवा एक धार्मिक स्थळ आहे. अशा गोष्टींचा विचार देखील करु शकत नाही, या धार्मिक भावना दुखावतात. पोलिसांमध्ये देखील अमली पदार्थाचे सेवन वाढल्याचे पाहून ड्रग माफिया गोव्यात यशस्वी झाल्याचे दिसते, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa NCRB Crime Report
Goa Assembly Election 2027
bjp National President nitin nabin advises cm pramod sawant damu naik
vijai sardesai warns goa govt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com