कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू हृदयविकाराने

पणजीत सापडलेल्या मृत व्यक्तीच्या शवचिकित्सा अहवालातून माहिती उघड
Death in Car Panjim
Death in Car PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राजधानी पणजीत पार्किंग क्षेत्रात कारमध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्या कर्नाटकातील तरुणाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. मृतदेह तसेच कार त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आल्याची माहिती पणजीचे पोलिस निरीक्षक निखिल पालयेकर यांनी दिली.

पार्किंग केलेल्या कर्नाटकमधील कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. तिथेच सापडलेल्या वाहन चालक परवान्याच्या आधारे श्रीकांत काचगार ची ओळख पटली होती. आज सकाळी त्याचे नातेवाईक गोव्यात आल्यावर मृतदेह त्यांना दाखवण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पुन्हा पंचनामा केला. मृतदेहावर जखमा नव्हत्या. त्याला विविध आजार असल्याचे नातेवाईकांनीच पोलिसांना सांगितले. फॉरेन्सिकच्या डॉक्टरांनी केलेल्या शवचिकित्सेत त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांनीही हरकत न घेता सोपस्कार पूर्ण करून मृतदेह स्वीकारला, असे पालयेकर यांनी सांगितले.

Death in Car Panjim
GMC मध्ये सापडलेला ‘तो’ गांजा वसतिगृहाच्या खोलीत की शौचालयात?

दरम्यान, मृतदेहाशेजारी पोलिसांना काल औषधांचा बॉक्स सापडला होता, त्याच्या आजारासंबंधीचे केस पेपर्स कारमध्ये सापडले होते. त्यावरून पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा अंदाज व्यक्त केला होता. नातेवाईकांशी पोलिसांनी केलेल्या संपर्कातही त्याचा मृत्यू जर्जर आजाराने झाल्याची शक्यता पुढे आली होती. कर्नाटकातून आणलेली कार त्याचीच होती व ती पत्नीच्या नावावर असल्याने ती पोलिसांनी कुटुंबीयांच्या ताब्यात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com