Goa Police: राज्यात 22 पोलिस निरीक्षकांची बदली; जाणून घ्या संपुर्ण यादी

पोलिस अधीक्षक एस. एम. प्रभुदेसाई यांनी काढले आदेश
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: पोलिस एस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या सुचनांनुसार राज्यातील 22 पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. पणजी येथील पोलिस मुख्यालयातील पोलिस अधीक्षक एस. एम. प्रभुदेसाई यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

Goa Police
Goa Woman Attacked: गोव्यातील महिला पत्रकाराला मनालीमध्ये गुंडांकडून मारहाण

सजित पिल्लई यांची फोंड्यातून ANC येथे बदली करण्यात आली आहे. अरूण देसाई यांची ANC मधून केपे येथे, दीपक पेडणेकर यांची केपेतून बेतूल कोस्टल येथे, विजयकुमार चोडणकर यांची फोंड्यातून सिक्युरिटी युनिट पणजी येथे, तुषार लोटलीकर यांची टीसी म्हापसा येथून फोंड्यात बदली करण्यात आली आहे.

मार्लन डिसुजा यांची पणजी सिक्युरीटी युनिटमधून टीसी म्हापसा येथे, मेल्सन कोलॅको यांची वेर्णा येथे बदली केली आहे. दिएगो ग्रॅसिया यांची वेर्ण्यातून पोलिस मुख्यालय पणजी येथे, विकास देयकार यांची कुडचडेतून रायबंदर येथे, सचिन पनाळकर यांची कोकण रेल्वेतून कुडचडे येथे,

तर सुनील गुदलार यांची पणजीतून कोकण रेल्वे येथे, अनुष्का पै-बीर यांची पीटीशन सेलमधून रायबंदर येथे, दत्तगुरू सावंत यांची कळंगुट येथून सिक्युरिटी युनिट पणजी येथे, परेश नाईक यांची म्हापशातून कळंगुट येथे बदली केली आहे.

Goa Police
Vadodara-Goa Flight: आता बडोद्यातुनही गोव्याला थेट विमानसेवा; गोव्यातून झाले पहिले उड्डाण

सचिन लोकरे यांची मुख्यालयातून पेडणे येथे, सीताकांत नायक यांची पणजी सिक्युरिटी युनिटमधून म्हापसा येथे, किशोर रामनन यांची फोंड्यातून रायबंदर येथे, शेरिफ जॅक्स यांची रायबंदर येथून जीआरपी ए कॉय येथे, रीमा नाईक यांची सायबर क्राईम मधून महिला पोलिस ठाण्यात,

तर सुरज गवस यांची डिचोलीतून पणजी मुख्यालयात, राहुल नाईक यांची बेतुल कोस्टल येथून डिचोली येथे, दत्ताराम राऊत यांची पेडण्यातून रायबंदर येथे नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com