Goa DGP सिंग यांची बदली अटळ! हालचालींना वेग, परदेशात असणाऱ्या IGP विष्णोई यांना तातडीचे बोलावणे

Goa DGP: आसगाव प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली अटळ असून, या पदाचा अतिरिक्त भार पोलिस महानिरीक्षकांकडे दिला जाण्याची शक्यता आहे.
Goa DGP सिंग यांची बदली अटळ! हालचालींना वेग, परदेशात असणाऱ्या IGP विष्णोई यांना तातडीचे बोलावणे
Goa DGP Jaspal Singh And IGP Omvir Singh BishnoiDainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला असून, याबाबतचा अहवाल केंद्राला पाठविण्यात आला आहे.

महासंचालक पदाचा अतिरिक्त भार राज्याचे तुरुंग पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे.

आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणी कारवाईसाठी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांचा दबाव होता. अशा प्रकारचा अहवाल हणजूण पोलिसांकडून राज्याच्या मुख्य सचिवांना सादर करण्यात आला. या अहवालात सिंग यांच्याविरोधात इतर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेत.

यामुळे जसपाल सिंग यांच्या निलंबनाची मागणी होत असताना राज्य सरकारकडून विद्यमान महासंचालक सिंग यांच्या बदलीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. बदलीसाठीचा अहलवाल देखील केंद्राकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

तसेच, या पदाची अतिरिक्त जबाबदारी राज्याचे तुरुंग पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे. परदेशात रजेवर असणाऱ्या ओमविर यांना तात्काळ हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Goa DGP सिंग यांची बदली अटळ! हालचालींना वेग, परदेशात असणाऱ्या IGP विष्णोई यांना तातडीचे बोलावणे
Goa Accident: कुठ्ठाळी-झुआरी पुलावर अपघातग्रस्त गाडी उलटलेल्या अवस्थेत

आसगाव प्रकरणाने राज्यात राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले. विरोधी पक्षातील नेत्यांनी जसपाल यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत त्यांच्या निलंबनासह सह-आरोपी करण्याची मागणी केली.

तर, याबाबत स्पष्टीकरण देताना जसपाल यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचा दावा केला.

तसेच, कोणताही पोलिस दुसऱ्या पोलिसाला खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय संशयित पूजा शर्माशी त्यांचा काहीही संबध नसल्याचे ते म्हणाले. पण आसगाव प्रकरणाबाबत राज्यातील सर्वच स्तरातून नाराजीसह जसपाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com