Goa Government: राज्य सरकारकडून प्रशिक्षण मिळते, मग नोकरी का नाही?

परिचारकांना जे शिक्षण द्यायला हवे, ते सर्व त्यांना दिले. परंतु त्यांना नोकरी देण्यास शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे.
Goa Government|Nurse
Goa Government|NurseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government on Nurse Employment: राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने कौशल्य विकास उद्योजकता संचालनालयाच्या अंतर्गत पणजी येथील आयटीआयमध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हा प्रशिक्षण कोर्स 2020 पासून सुरू करण्यात आला.

परिचारकांना जे शिक्षण द्यायला हवे, ते सर्व त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये इंटर्नशीप देखील पूर्ण केली. परंतु त्यांना नोकरी देण्यास शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे.

Goa Government|Nurse
Goa Government: हे सरकार ''इव्हेंट मॅनेजमेंट सरकार''

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. परंतु सरकारने भरती नियमांमध्ये तरतूद न केल्याने रोजगार मिळत नसल्याची खंत एका विद्यार्थ्याचे पालक, आंतोनियो आझावेदो यांनी व्यक्त केली. ते आझाद मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्ता तारा केरकर उपस्थित होत्या. आझावेदो पुढे म्हणाले, या विद्यार्थ्यांना जे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, त्यात विद्यार्थ्यांनी शिकविण्यात आलेल्या विषयांची नोंद नाही, केवळ बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एमपीएचडब्लू असे लिहिले आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणते प्रशिक्षण दिले, याची माहिती नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत, शासनाद्वारे त्यांच्या रोजगारासाठी यापूर्वीच तरतूद करायला हवी होती, मात्र अजून केलेली नाही, त्यामुळे प्रशिक्षिण असून देखील रोजगाराविना या तरुणांचे भवितव्य अधांतरीच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली

Goa Government|Nurse
Mahadayi Water Dispute: जीवनदायिनी ‘म्हादईबचाव’साठी विधानसभा, लोकसभेत चर्चा करा

पुरुष साहाय्यक परिचारकांची गरज

राज्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये पुरुष रुग्णांना सांभाळण्यासाठी त्यांना लघवी जाण्यासाठी कॅथेटर वापरले जाते, हे लावण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना अडचण येते. त्यावेळी या साहाय्यक पुरुष परिचारिकांचा उपयोग होतो तसेच इतर अनेक ठिकाणी त्यांची गरज असते.

राज्यात साहाय्यक पुरुष परिचारकांचा तुटवडा असून देखील त्यांना नोकरीत रुजू केले जात नाही. त्यांना गोमेकॉ, जिल्हास्तरीय रुग्णालयात रुजू करून घ्यावे, असे तारा केरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com