गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Sepak Takraw Association president death: सॅपेक टॅकरो राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने योगिंदर आणि अंकित गोव्यात आले होते. २७ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा राज्यात पार पडली.
From Left Side Dead Yogender Singh President of the All India Sepak Takraw Association and Ankit Kumar Baliyan
From Left Side Dead Yogender Singh President of the All India Sepak Takraw Association and Ankit Kumar BaliyanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बांबोळी येथे रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. कार आणि टँकरच्या झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघेही सॅपेक टॅकरो या खेळाशी निगडीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष योगेंदर सिंग दहिया (४२, रा. दिल्ली) आणि याच खेळातील वरिष्ठ खेळाडू अंकित कुमार बालियान (उत्तर प्रदेश) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

सॅपेक टॅकरो राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने योगिंदर आणि अंकित गोव्यात आले होते. २७ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा राज्यात पार पडली. बांबोळीत झालेल्या भीषण अपघातात दोघांना जीव गमवावा लागला.

From Left Side Dead Yogender Singh President of the All India Sepak Takraw Association and Ankit Kumar Baliyan
Goa Police: कायदा हातात घ्याल तर याद राखा; गोवा पोलिस महासंचालकांची क्लब मालकांना तंबी

मध्यरात्री एकच्या सुमारास रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणारा टँकर कारला येऊन धडकला. भरधाव टँकर डिव्हायडर तोडून कारवर आदळला होता. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

तसेच, टँकर देखील रस्त्याच्या कडेला पलटी झाला. मृतांना शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले. पोलिसांनी पंचनामा केला.

From Left Side Dead Yogender Singh President of the All India Sepak Takraw Association and Ankit Kumar Baliyan
डायपरमुळे लहान मुलांच्या किडनीला धोका? व्हायरल व्हिडिओतील दावा डॉक्टरांनी काढला खोडून, वाचा काय म्हणाले

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन टँकर चालक राहुल सरवदे याला अटक केली आहे. अमर्यादीत वेग आणि टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, सॅपेक टॅकरो खेळाशी निगडीत दोघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने क्रीडा क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com