
पणजी: भारतीय फुटबॉलच्या प्रगतीत खेळाच्या पायाभूत विकासाची गरज माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांनी प्रतिपादली आहे. त्यांच्या मताशी माजी आंतरराष्ट्रीय गोलरक्षक सुब्रत पॉल यांनीही सहमती दर्शविली.
ड्रीम स्पोर्टस फाऊंडेशनच्या राष्ट्रीय पातळीवरील अंतिम लढतीनिमित्त भुतिया व पॉल गोव्यात आले होते, त्यावेळी त्यांनी भारतीय फुटबॉलविषयी मत व्यक्त केले.
याविषयी भुतिया यांनी नमूद केले, की ‘‘भारत हा मोठा देश आहे. त्यामुळे वयोगट पातळीवरील स्पर्धांची आवश्यकता आहे. ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनने १७ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा सुरू करून एक चांगलं काम केले आहे. येत्या काही वर्षांत भारतातील ही सर्वांत मोठी पायाभूत पातळीवरील फुटबॉल स्पर्धा बनू शकते.’’
मुलांनी मोबाईल फोन बाजूला ठेवून फुटबॉल खेळायला हवे. मी देखील पालक आहे, त्यामुळे या गोष्टींमधील अडचणी मला समजतात. देशात फुटबॉल निवडीसाठी पुरेशी गुणवत्ता उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक मुलांनी फुटबॉल खेळणे आवश्यक असल्याचे मतही भुतिया यांनी व्यक्त केले.
माजी गोलरक्षक सुब्रत यांनी १० वर्षांखालील आणि १८ वर्षांखालील वयोगटात फुटबॉल प्रशिक्षण आणि स्पर्धांची अधिक आवश्यकता असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.