गोवा, आग्रा आणि बिहारमध्ये झाले धर्मांतर; उत्तर भारतातील उच्चशिक्षित टोळीच्या शोधात पोलीस

धर्मांतर करण्यात आलेले लोक देखील पुन्हा धर्मांतर करण्याच्या कामात गुंतले आहेत.
Religious Conversion
Religious ConversionDainik Gomantak

धर्मांतर करणाऱ्या टोळीचा सध्या गाझियाबाद पोलीस शोध घेत आहेत. मुसीरच्या टोळीने दिल्लीतील चार जणांचे धर्मांतर केले असून, पोलीस सध्या त्यांच्याही मागावर आहेत. पोलिसांनी या चारही जणांच्या घरावर छापे टाकले मात्र, तेथून त्यांना काहीच मिळाले नाही. दरम्यान, 8 जुलै रोजी मुसीरला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

मुसीरच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते गोवा, बिहार आणि आग्रा येथे सापडले. मुसीरने सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा करून बी.टेक.चे शिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे.

अमर उजला या हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे धर्मांतर करण्यात आलेले लोक देखील पुन्हा धर्मांतर करण्याच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे ज्या चार जणांचे धर्मांतर करण्यात आले आहे, त्यांचा शोध महत्वाचा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

अमित राठोड, अमृत सिंग आणि कपिल आनंद हे मुसीरचे सहकारी अहमद अब्दुल्लाचे ओळखीचे आहेत. तिघांचेही धर्मांतर पलवल येथील अब्दुल्ला याने केले होते. चौथा अजय, जो मुसीरहून दिल्लीच्या संगम विहार येथील मशिदीत शिक्षण घ्यायचा. त्याचे धर्मांतर मुसीरनेच केले होते. पूर्वी त्याचे नाव सौरभ खुराना होते.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून (एएमयू) सौरभने बीडीएसचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणादरम्यान 2014 मध्ये त्यांचे धर्मांतर झाले. तो दिल्लीत दंत चिकित्सालय चालवायचा. तो क्लिनिकमध्येच धर्मांतर करायचा. अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

Religious Conversion
दूध पाजून आईने मुलाला खाली ठेवले अन् सात दिवसांच्या चिमुकल्याचा श्वास थांबला, माजोर्डा येथील दुर्दैवी घटना

धर्मांतर केलेल्या लोकांना याच कामात दे सहभागी करून घेतात अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी आहे. मुसीरने प्रथम सौरभचे धर्मांतर करून त्याला अब्दुल्ला केले. अब्दुल्ला बनून त्याने देखील धर्मांतर सुरू केले.

या दोघांच्या संपर्कात आल्यावर दिल्ली तील संगम विहार येथील रहिवासी राहुल अग्रवालने धर्मांतर केले आणि तो राहिल खान झाला. यानंतर राहिलनेही धर्मांतर करण्यास सुरुवात केली. अब्दुल्लाने राहिलचे लग्न त्याची मेहुणी इक्राशी केले. असे अमर उजालाच्या वृत्तात म्हटले आहे.

याचप्रमाणे अमित राठोड, अमृत सिंग, अजय आणि कपिल आनंद हे देखील धर्मांतराच्या कामात गुंतले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. त्यांच्याकडून पकडले गेल्यावर त्यांच्याशिवाय अब्दुल्ला आणि मुसीर यांनी कोणाचे धर्मांतर केले होते, हेही कळेल असे पोलिसांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com