पेडे जंक्शनवर लवकरच वाहतूक सिग्नल

15 दिवसात काम सुरू : नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांची माहिती
Traffic signal
Traffic signal Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : धोकादायक बनलेल्या म्हापसा येथील पेडे जंक्शनवर येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्षात ट्रफिक सिग्नल बसविण्याच्या कामास सुरवात होणार आहे.

Traffic signal
पेडण्यात वाहतूक व्यवस्थेचा अभाव ; कदंब परिवहन महामंडळाला निवेदन सादर

म्हापसा नगरपालिकेने यापूर्वीच पेडे जंक्शनवर ट्रफिक सिग्नल बसविण्याचा ठराव घेतला होता. आठवडाभरात पालिकेची पुन्हा बैठक आहे. त्यावेळी मागील बैठकीतील इतिवृत्तास मान्यता घेऊन हा ठराव पुढे संबंधित प्राधिकरणाला पाठविला जाईल. त्यानंतर पंधरा दिवसांत हे काम सुरु होईल, अशी माहिती म्हापसा नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी दिली.

मध्यंतरी, या जंक्शनवरील स्थितीचा आढावा घेण्यासाठी म्हापसा व हळदोण्याच्या आमदारांनी संबंधित विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी केली होती. वाहतुकीत सुसूत्रता राखण्यासाठी याठिकाणी महिन्याभरात तात्पुरता वाहतूक सिग्नल उभारण्याचा निर्णय त्यावेळीच घेतला होता.

हा पेडे जंक्शनवरील रस्ता क्रॉसिंगसाठी खुला ठेवू नये, अशी सूचना करीत म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी विरोध केला होता. कारण, जेव्हा रस्ता तीनपट रुंद होतो, त्यावेळी तो ओलांडण्यासाठी वेळ जास्त लागतो. भविष्यात अशी स्थिती उद्भवेल, म्हणूनच ते याच्या विरोधात होते. मात्र, लोकांनी हळदोणाचे माजी आमदार टिकलो यांच्यावर दबाव टाकून हे जंक्शन क्रॉसिंगसाठी खुले ठेवून घेतले होते. मात्र, आता हा जंक्शन मृत्यूचा सापळा बनला असून, तिथे आठवड्याला सरासरी तीन-चार अपघात घडताहेत.

Traffic signal
वास्कोतील दुकानात चोरी; 20 हजारांची रोकड केली लंपास

ट्रॅफिक सिग्नल तसेच आवश्यक सुरक्षा खबरदारी न घेतल्यानेच हा पेडे जंक्शन धोकादायक बनला आहे. या जंक्शनचा वापर क्रॉसिंगसाठी पेडे क्रीडा संकुलाचा वापर करणारे क्रीडापटू तसेच स्थानिक, म्हापसा जिल्हा इस्पितळाला जाणारे रुग्ण, आकय, कामरखाजन, पेडे-करासवाडामधील लोक याचा उपयोग करतात. शिवाय राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबई, पूणे, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना याच मार्गाचा अवलंब करावा लागतो.

पणजीच्या दिशेने अनेक वाहने पेडे जंक्शनवरून वळसा घेत म्हापशाच्या दिशेने गाडी वळविण्याचा प्रयत्न करताना खूप त्रास होतो. शिवाय वाहनांच्या संख्येमुळे गाडी चालकांना क्रॉसिंगवेळी जीव मुठीत धरून हा रस्ता ओलांडावा लागतो. आता शाळा सुरू झाल्याने ही वर्दळ आणखी वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com