CM Pramod Sawant : आता पर्वरीतील वाहतूक कोंडी संपणार

राज्यातील रस्तेबांधणीसाठी केंद्राकडून 2,228 कोटी रुपये मंजूर
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : रस्ते अपघातांमुळे त्रस्त झालेल्या गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील रस्त्यांच्या बांधणीसाठी केंद्र सरकारने तब्बल 2 हजार 228 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रस्ते प्रकल्पांचा अहवाल राज्याने केंद्राला पाठवला होता. त्याला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात वाहतुकीच्या साधनसुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे आम्ही काही प्रस्ताव पाठवले होते, त्या सर्व प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय आपत्कालीन व्यवस्थेसाठीच्या कामासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

Goa CM Pramod Sawant
Goa Mining : पर्यावरणीय हानी, तळी, शेती आणि कामगारांचे प्रश्न अनुत्तरित

त्यामुळे ही काम आता मार्गी लागतील. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. या रस्ता कामांमध्ये पर्वरी येथे उभारण्यात येणाऱ्या सहापदरी फ्लायओव्हर च्या बांधकामासर राज्यातील अन्य काही रस्त्यांचा समावेश आहे.

माशे ते पोळे रस्त्यासाठी 177.35 कोटी रुपये मंजूर

मडगाव-कारवार हमरस्त्यावरील करमल घाटातील गुळे ते बेंदुर्डे चौपदरी रस्त्याच्या भू-संपादनासाठी 79 कोटींची तरतूद तर माशे ते पोळे सीमेपर्यंत चौपदरी रस्त्यासाठी 177.35 कोटी रुपये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजूर केले आहेत. त्यामुळे अपघातप्रवण करमल घाटातील चौपदरी रस्ता अखेर दृष्टीक्षेपात आला आहे.

अपघातसत्र थांबणार

अलीकडच्या काळात काणकोण तालुक्यातील करमल घाट हे अपघातांचे केंद्र बनले आहे. या नागमोडी घाट रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन मोठी आणि अवजड वाहने पलटी होत आहेत. यासाठीच या घाट रस्त्याच्या चौपदरीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. बेंदुर्डे ते काणकोण बायपास रस्त्याच्या जमीन संपादनासाठी तब्बल 79 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या कामांना मंजुरी

  • पर्वरी येथे सहापदरी पूल उभारणी : 600 कोटी

  • नावेली ते कुंकळ्ळी चौपदरी रस्ता : 391 कोटी

  • माशे ते पोळे बायपास रस्ता : 177 कोटी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com