Traffic Issue: ‘विकेंड’मुळे गर्दी; पर्वरीत वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप

Traffic Issue: नाताळ आणि सलग सुट्यांमुळे राज्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. रविवारी पर्वरी भागात वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांबरोबर स्थानिक ग्रामस्थांनाही मनस्ताप सहन करावा लागला.
Panjim Traffic Jam
Panjim Traffic JamDainik Gomantak
Published on
Updated on

Traffic Issue: नाताळ आणि सलग सुट्यांमुळे राज्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. रविवारी पर्वरी भागात वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांबरोबर स्थानिक ग्रामस्थांनाही मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडीची अनेक कारणे असली तरी रस्त्यालगत वाहने पार्क केली जाणे हे मुख्य कारण आहे.

Panjim Traffic Jam
Panjim City: पणजीतील पथदीप धोकादायक

अनेक वेळा आवाज उठवूनही या विरोधात काहीच कारवाई होत नाही. पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोलमडते. वाहनचालकांना नाहक ताटकळत उभे राहावे लागते.

दरम्यान, स्थानिक आमदार तथा पर्यटन मंत्री रोहन खंवटे हे उड्डाण पूल तसेच रस्ता रुंदीकरणासाठी आग्रही आहेत, परंतु अजून या कामाला चालना मिळालेली नाही. उड्डाण पूल झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.

Panjim Traffic Jam
Goa Forest: आसगाव वन क्षेत्रातील झाडे कापण्यास खंडपीठाची स्थगिती

पणजी शहरात वाहनांची संख्या वाढली असतानाही वेगमर्यादेचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही धडक मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मिरामार ते दोनापावल या बायपास रस्त्यावर सकाळच्या प्रहरी वाहनांची मोठी वर्दळ नसल्याने वाहन चालक वेगमर्यादेचे उल्लंघन करून भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिस विभागाकडे आल्या होत्या.

सकाळच्यावेळी काही लोक मॉर्निंग वॉकसाठी जातात त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकांचे नियंत्रण जाऊन पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना धोका संभवू शकतो. स्पिड रडारवर नोंद झालेली वेगमर्यादा मर्यादेपेक्षा अधिक असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही मोहीम या रस्त्यावर अधूनमधून सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पर्वरीच्या बाजूने अटल सेतूवर दुचाकींना बंदी असल्याचा फलक असूनही अनेक पर्यटक दुचाकीने या पुलावर येतात. त्यांना मेरशीच्या बाजूने अडविले जाते.

पुलाच्या आकर्षणाने आलेल्या पर्यटकांना अडवून त्यांच्याकडून नो एन्ट्रीप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाते. या पुलावर 40 किलोमीटर वेगमर्यादा असतानाही 80 ते 100 किलोमीटर वेगाने वाहन चालक पुलावरून येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com