Panjim City: पणजीतील पथदीप धोकादायक

Panjim City: स्विच बॉक्स खुले: शहरातील खांब बदलण्याचे काम अपू्र्णच
Panjim City
Panjim CityDainik Gomantak

Panjim City: पणजीत सध्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे आणि स्मार्ट रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु राजधानीत असलेले पथदीप धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कारण अनेक ठिकाणी पथदीपावर असलेल्या स्विच बॉक्स खुले असून, या खांबाजवळून अनेकजण ये-जा करीत असतात, त्यामुळे हे स्विच बॉक्स कधीही धोका निर्माण करू शकतात.

Panjim City
Goa News: मांगोरवासीयांना मिळणार नौदल परिसरातून रस्‍ता

पणजी शहरातील खराब झालेले रस्त्यांच्या बाजूचे वीज दिव्यांचे लोखंडी खांब हटविण्याचे काम वीज खात्यातर्फे सुरू झाले होते. परंतु आता पुन्हा थंडावले आहे. शहरातील अनेक लोखंडी खांब आहेत, त्यावर केबल टीव्हींच्या वाहिन्यांचे जाळे टांगते दिसत आहे. मध्यंतरी महानगरपालिकेने काही खांबावरील केबल तोडल्या, पण त्यानंतर जैसे थी स्थिती राहिली आहे. नव्याने टाकलेल्या खांबावरून पुन्हा केबल ओढल्या गेल्या आहेत.

स्मार्ट सिटीच्या कामात रस्त्याचे रुपडे बदलणार असल्याने नव्याने वीज खांब टाकण्यात येणार आहेत, त्यामुळेच सध्या ते बदलेलले नसले तरी खांबावरील खुले ठेवलेले स्विच बॉक्स बंद करणे वीज खात्याचे काम होते. एखादी अघटित घटना घडल्यानंतरच विविध सरकारी खात्यांची डोळे उघडतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

पणजीत स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ट्रान्स्फॉर्मर बदलून त्या ठिकाणी अत्याधुनिक संयंत्र उभारले आहे. परंतु अजूनही शहरात फ्युज असणारे बॉक्स नजरेस पडत आहेत. या लोखंडी बऱ्याच बॉक्सची स्थितीही बिकट आहे, ते बॉक्स अद्याप इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) का बदलले नाहीत? असा प्रश्‍न सहजपणे नागरिकांत उपस्थित होत आहे.

सहा महिन्यांचा अवधी

पणजीतील स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी गतवर्षी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने सहा महिन्यांची म्हणजेच जून २०२४ पर्यंत मुदत वाढविली आहे. २०१६ पासून स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत, त्यातील कोरोना काळातील दोन वर्षे सोडली तर पाच वर्षांत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण व्हायला हवी होती. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आव्हान आयपीएससीडीएल पुढे आहे. त्यामुळे उर्वरित काळात उर्वरित ५९४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे १९ प्रकल्पांचे कामे पूर्ण करावयाची आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com