Traffic Problem: मोरजी, वागातोर, पर्वरीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या

Traffic Problem: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी चित्रपट, उद्योग, राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींबरोबरच देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.
Goa Traffic
Goa TrafficDainik Gomantak

Traffic Problem: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी चित्रपट, उद्योग, राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींबरोबरच देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पणजी, म्हापसा, पर्वरीसारख्या किनाऱ्यालगतच्या शहरांमध्ये शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

Goa Traffic
Parking Problem: जुने गोवेत बेशिस्त पार्किंग

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतून अनेक वाहने गोव्यात दाखल झाली आहेत. तसेच राज्यात काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने स्थानिक तसेच पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

शनिवारी सायंकाळपासून किनारी भागातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दिसून आली. विशेषतः सनबर्नला जाणाऱ्या वागातोर रस्त्यावर तर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तसेच किनाऱ्यालगतच्या कळंगुट, बागा, मोरजी, हरमल, शिवोली, आश्वेसारख्या रस्त्यांवर २-२ तास वाहतूक कोंडी झाली होती.

वाहतूक पोलिस जागोजागी तैनात असूनही वाहतुकीचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला.

उत्साही वातावरण

गोवा राज्यातील विविध समुद्रकिनारे, हॉटेल्ससहित रिव्हर क्रुझ, तसेच कॅसिनो जहाजांवरही पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. मद्याच्या दुकानांवरदेखील खरेदीसाठी झुंबड दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पर्यटनस्थळे गजबजलेली आहेत. पार्ट्या, मोठ-मोठ्या मेजवान्यांचे आयोजन नववर्ष स्वागतासाठी होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com