Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Marcel Traffic: पंचायत मंडळाने पाव विक्रेत्या पोदेरांसाठी ठरावीक जागा निश्चित केली आहे. जुने बसस्थानक परिसर, मासळी बाजार, भाजी बाजाराच्या ठिकाणी पाव विक्री केली तर कोणालाही अडचण होणार नाही.
Marcel Traffic
Marcel TrafficDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: माशेल बाजारात पोदेरांमुळे सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पावविक्री केली जाते, त्यावेळी ग्राहकही वाहनांतूनच खरेदी करतात, काही लोक जी-पेसाठी वाहनांतून मोबाईल बाहेर काढतात, तेव्हा इतरांना रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होते. त्यामुळे नित्य होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका समान्यांना बसतो.

पंचायत मंडळाने पाव विक्रेत्या पोदेरांसाठी ठरावीक जागा निश्चित केली आहे. जुने बसस्थानक परिसर, मासळी बाजार, भाजी बाजाराच्या ठिकाणी पाव विक्री केली तर कोणालाही अडचण होणार नाही. पण, पोदेर पंचायत मंडळाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरच आपल्या गाड्या, सायकली उभ्या करून पावविक्री करतात.

या काळात काही छोटे-मोठे अपघातही होत आहेत. एकमेकांच्या गाड्यांची घर्षणे होत असून वादही होतात. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पोदेरांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Marcel Traffic
Goa Traffic Policy: गोव्‍यात दरवर्षी 300 अपघाती मृत्यू! ही संख्या घोषणांनी कमी होणार नाही, धोरण राबवणे महत्वाचे

पंचायतीने पोदेरांना जागा दिली; पण रस्त्यावर अडचण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. फक्त आदेश देऊन नाही, तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी, जो कोणी रस्त्यावर पावविक्री करतो, त्यांच्या वाहनासह सर्व साहित्य जप्त करायला हवे. तरच पोदेरांचा उपद्रव कमी होईल, असे माशेलातील ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.

Marcel Traffic
NH66 महामार्गावरील दगड मातीचा ढीग जैसे थे, महिन्यापासून मार्ग पूर्ववत करण्याकडे प्रशासनाचे दुर्लेक्ष

माशेल बाजारात पोलिस, होमगार्ड वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करतात; पण कोपऱ्या-कोपऱ्यावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या पोदेंरावर कारवाई केली जात नाही. या प्रकाराकडे पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पोदेरांची समस्या निकालात काढली तर वाहतूक कोंडी होणार नाही, त्यासाठी पोलिसांनी सक्रिय होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com