डिचोलीत प्रसिद्ध 'नवा सोमवार' उत्सव येत्या 13 तारखेला

संपूर्ण गोवा तसेच राज्याबाहेर प्रसिद्धीस पावलेला डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचा प्रसिद्ध 'नवा सोमवार उत्सव' यंदा येत्या 13 डिसेंबर रोजी पारंपारिकपद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
 Traditional Goa
Traditional Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Traditional Goa : संपूर्ण गोवा (Goa) तसेच राज्याबाहेर प्रसिद्धीस पावलेला डिचोली (Bicholim) येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचा प्रसिद्ध 'नवा सोमवार उत्सव' यंदा येत्या 13 डिसेंबर रोजी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात करण्यात येणार आहे. गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या या उत्सवानिमित्त यंदाही गायन मैफिलींचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव 'कोविड' एसओपी पाळून साजरा करण्यात येणारअसल्याची माहिती ग्रामस्थ गावकर मंडळाच्या उपस्थितीत देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम (सतीश) गावकर आणि सचिव श्यामू गावकर यांनी दिली. यावेळी अशोक परब, वासुदेव परब, कांता गावकर, अमृत परब, रवळू गावकर, लक्ष्मण गावकर,आशिष गावकर, सतीश परब, निशाकांत परब, दीपक परब, आदित्य गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 Traditional Goa
BJP मंत्री सेक्स स्कँडल्समध्ये गुंतले असताना, राज्यातील महिलांना सुरक्षा कशी मिळणार?

या उत्सवानिमित्त सकाळी श्री शांतादुर्गा मंदिरात महाभिषेक, लघुरुद्र, आरती आणि तीर्थप्रसाद होणार आहे. या उत्सवानिमित्त भाविकांना देवीच्या चरणी भक्तीरूपाने सेवा करण्याची संधी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होणार आहे. रात्री 9 वा. श्री शांतादुर्गा देवीला गाऱ्हाणे घातल्यानंतर भांबर्डे येथील शांतादुर्गा भजनी मंडळाचे भजन आणि बँडवादनासह देवीच्या जयघोषात पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यावेळी दारूकामाची आतषबाजी करण्यात येणार आहे. पहाटे पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर आरती, तीर्थप्रसाद आणि गाऱ्हाणे होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळाकडून देण्यात आली.

 Traditional Goa
चर्चिल यांचा 'सस्पेन्स' कायम, दोन आठवड्यासाठी 'व्हेट अँड व्हॉच'

गायन मैफिलींचे आयोजन

रात्री 10 वा. श्री शांतादुर्गा देवीच्या प्रांगणात 'स्वर सुमनांचे झेले' हा नाट्य, भक्ती आणि भावगीत गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. या मैफिलीत पुणे येथील सुप्रसिद्ध गायक जसराज जोशी आणि मुंबई येथील गायिका सौ. मनिषा निश्चल हे कलाकार भाग घेणार आहेत. वर्षा मळीक निवेदन करणार आहेत.

मध्यरात्री दीड वाजता श्री रवळनाथ देवाच्या प्रांगणात 'गुंफीली स्वर फुले' हा नाट्य, भक्ती आणि सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या मैफिलीत मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक अभिषेक मारोतकर आणि तनिषा मावजेकर (गोवा) हे कलाकार गायन सादर करणार आहेत. संगीता जोशी (मुंबई) या निवेदिका आहेत.

 Traditional Goa
माजाळी चेक पोस्टवर कर्नाटक अबकारी खात्याने पकडली अवैध दारु

रांगोळी स्पर्धा

नवा सोमवार उत्सवानिमित्त यंदाही रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आणि डिचोली पालिका मर्यादित अशा दोन गटात कोमुनिनाद सभामंडपात घेण्यात येणार आहे. रविवारी (ता. 12) सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि सोमवारी (ता.13) सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या अवधीत रांगोळी रेखाटावी लागणार आहे. स्पर्धेसाठी यंदाही आकर्षक रोख बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com