माजाळी चेक पोस्टवर कर्नाटक अबकारी खात्याने पकडली अवैध दारु

बेकायदेशीरपणे मद्यार्काची वाहतुक करणाऱ्या वाहनातून माजाळी तपासणी नाक्यावर वाहनासहीत 3 लाख 21 हजार 200 रूपयांची दारू माजाळी (Majali) तपासणी नाक्यावर जप्त करण्यात आली आहे.
Alcohol
AlcoholDainik Gomamantak
Published on
Updated on

काणकोण: पोळे तपासणीच्या बेफिकिरी मुळे सुटला मात्र कर्नाटक अबकारी खात्याने पकडले. पोळे तपासणीच्या बेफिकिरीमुळे गोव्यातून (Goa) कर्नाटक (Karnataka) राज्यात बेकायदेशीरपणे मद्यार्काची वाहतुक करणाऱ्या वाहनातून माजाळी तपासणी नाक्यावर वाहनासहीत 3 लाख 21 हजार 200 रूपयांची दारू माजाळी तपासणी नाक्यावर जप्त करण्यात आली आहे.

Alcohol
शिवोलीतील अपार्टमेंटमध्ये मुंबई स्थित तरुणाचा झोपेतच मृत्यू

आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास केए 307532 ही मासे वाहू गाडी पोळे तपासणी नाक्यावरून गेली मात्र पोळे तपासणी नाक्यावर त्या गाडीची तपासणी न करताच त्या गाडीला सोडण्यात आले.या गाडीच्या छुप्प्या कमार्प्मेंटमध्ये दारूच्या बाटल्या ठेवून वाहतूक करण्यात येत होती.त्या वाहनाच्या कप्प्यातून 750 मिली लिटरच्या 768 मद्यार्काच्या बाटल्या ज्याची किंमत 1 लाख 71 हजार 200 रूपये आहे व वाहनाची किंमत 1 लाख 50 हजार रूपये आहे असा ३लाख 21 हजार रूपयांचा ऐवज कर्नाटक अबकारी खात्याने माजाळी तपासणी नाक्यावर आज जप्त केला आहे.आज पर्यत कर्नाटक अबकारी खात्याने अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी सत्तावीस वाहने जप्त केली आहेत. मात्र या काळात पोळे तपासणी नाक्यावर फक्त एकच वाहन जप्त करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com