Charter Flights: इस्राईल, कझाकिस्‍तान येथूनही येणार पर्यटक

Charter Flights: चार्टर विमानांचे 25 स्‍लॉट्‌स ‘दाबोळी’वर आरक्षित
Denmark Goa Charter Flight
Denmark Goa Charter FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Charter Flights: रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्धामुळे रशियातून गोव्‍यात येणाऱ्या रशियन चार्टर प्रवाशांची संख्‍या घटली होती, आणि त्‍यामुळे गोव्‍याच्‍या पर्यटनावरही विपरित परिणाम झाला होता. मात्र यंदा हे सावट दूर झाले असून रशियाबरोबरच यावेळी गोव्‍यात इस्राईल आणि कझाकिस्‍तान येथील चार्टर प्रवासी या महिन्‍यात येणार असून युकेहून येणारी चार्टर विमाने नोव्‍हेंबर महिन्‍यात सुरु होणार आहेत.

Denmark Goa Charter Flight
Government Job: सरकारी सेवेत निवडीसाठी आता कृत्रिम प्रज्ञेचा वापर

काल रविवारी रशियाहून सुमारे 300 प्रवाशांना घेऊन पहिले चार्टर विमान दाबोळीला दाखल झाले होते. दर आठवड्याला रशियातून तीन चार्टर विमाने गाेव्‍यात येणार असल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे. चालू ऑक्‍टोबर महिन्‍यात रशिया, इस्रायल आणि कझाकिस्‍तान येथून येणाऱ्या २५ चार्टर स्‍लॉट्‌सचे आरक्षण दाबोळी विमानतळावर झाले आहे,

अशी माहिती दाबोळी विमानतळ प्राधिकरणाच्‍या सूत्रांनी दिली आहे. प्राप्त माहितीप्रमाणे, एअर आस्‍त्रा ही विमान कंपनी कझाकीस्‍तान येथील अलमाटी येथून तर आर्किया एअरलाईन्‍स ही विमान कंपनी इस्‍त्राईलच्‍या तेल अविव्ह येथून चार्टर प्रवासी घेऊन गोव्‍यात येणार आहे. तर रशियाहून ॲरो फ्‍लोटच्या विमानाने 255 प्रवाशी नुकतेच दाखल झाले आहेत.

युकेहून येणारी चार्टर विमाने यंदा काहीशी उशिरा सुरू होणार असून ही विमाने नोव्‍हेंबरमध्ये गोव्‍यात दाखल होतील, असे सांगण्यात आले.

‘युके’ची विमाने ‘मोपा’वर उतरणार

दाबोळी येथील विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सध्‍या तरी आमच्‍याकडे ऑक्‍टोबर महिन्‍यात किती विमाने याचीच माहिती उपलब्‍ध आहे. पुढे ही संख्‍या वाढणार की कमी होणार, याची माहिती आम्‍हाला दिल्‍लीहून मिळेल. ‘युके’तून येणारी काही विमाने मोपातील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावरही उतरण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहेत.

सध्‍या इस्‍त्रायलहून एक तर कझाकीस्‍तानमधून तीन चार्टर विमाने गोव्‍यात येणार आहेत. आता युरोपमधूनही गोव्‍यात चार्टर विमाने येणार आहेत. त्यामुळे गोव्‍यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्‍या यावेळी निश्‍चितच वाढेल. गोव्‍यातील आदरातिथ्‍य क्षेत्रासाठी ही चांगली बातमी ठरेल.

- नीलेश शहा, टीटीएजी अध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com