Government Job: सरकारी सेवेत निवडीसाठी आता कृत्रिम प्रज्ञेचा वापर

Government Job: जुझे मान्युएल नरोन्हा: सिक्कीम येथे राष्ट्रीयस्तर बैठक
Goa Government Job
Goa Government JobDainik Gomantak

Government Job: सरकारी सेवेसाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी लोकसेवा आयोगाकडून नजीकच्या काळात (एआय) कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर तसा विचार सुरू असल्याची माहिती गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

Goa Government Job
Goa News : हरकतींसाठी जमीन आराखडा उपलब्ध करा ; पेडणेवासीयांचे आमदारांना निवेदन

त्यांनी सांगितले, सध्या प्राथमिक टप्प्‍यांवर ही बोलणी असली तरी कृत्रिम प्रज्ञेचा वापर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेण्यासाठी करण्याचा निर्णय तत्वतः घेण्यात आला आहे. आगामी काळात त्याचा तपशील आणि पद्धती ठरवण्यात येणार आहे.

गंगटोक सिक्कीम येथे देशभरातील लोकसेवा आयोगांच्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी नरोन्हा गेले होते. ते या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. तेथून परतल्यावर त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या बैठकीत प्रामुख्याने कृत्रिम प्रज्ञेच्या वापरावर सखोल चर्चा झाली.

सरकारी सेवेसाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याची जबाबदारी लोकसेवा आयोगांवर असते. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा आधार घेण्यावर एकमत झाले.

पारदर्शी निवडीसाठी ‘एआय’ स्वागतार्ह !

या दोन दिवसीय बैठकीचे उद्‍घाटन राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यानी केले. त्यांनीही योग्य व्यक्तीची निवड जनतेला सेवा देण्यासाठी का महत्त्वाची असते यावर भाष्य केले. अधिकारी भऱती पूर्णतः पारदर्शी पद्धतीने करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेच्या वापराचेही त्यांनी स्वागत केले. या बैठकीला आसाम, नागालॅण्ड, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश आणि सिक्कीमच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com