Robbery of Maharashtra Tourists in Calangute By Touts
Robbery of Maharashtra Tourists in Calangute By Toutsnik Gomantak

Goa Tourism: पुन्हा गोव्यात येणार नाही! कळंगुटमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची लूट, गोवा सरकारवर उपस्थित केले प्रश्न

Goa Tourism: पर्यटकांना मारहाण; सरकारने त्वरित कारवाई करण्याची मागणी
Published on

Robbery of Maharashtra Tourists in Calangute By Touts: राज्यात एकीकडे 37व्या राष्ट्रीय स्पर्धेची धामधूम सुरू असताना दुसरीकडे पर्यटकांना लुटण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

कळंगुटमधील पबमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरमधून आलेल्या दोन पर्यटकांची लूट झाल्याची घटना घडली. याबाबत पर्यटकांनी गोवा पोलीस आणि सरकारवर नाराजी व्यक्त केली.

Robbery of Maharashtra Tourists in Calangute By Touts
Goa Accident Cases: राज्यात अपघातांची मालिका सुरूच! थिवी, धारगळ अन् मालपेत अपघातांची नोंद

संपूर्ण प्रकार असा की....

पर्यटकांंनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अहमदनगरमधून दोन पर्यटक कामानिमित्त गोव्यात दाखल झाले होते. कंपनीने बुक केलेल्या हॉटेलमध्ये ते वास्तव्यास असताना मंगळवारी (24 ऑक्टोबर) संध्याकाळी फिरण्यासाठी म्हणून ते बाहेर पडले.

त्यावेळी किनाऱ्यावर पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीने त्यांना आपला निशाणा बनवले. पबमध्ये नेण्याच्या बहाण्यावरून त्यांनी एके ठिकाणी त्या दोघा पर्यटकांना नेले.

अहमदनगरसारख्या जिल्ह्यामध्ये पब ही संकल्पना नसल्यामुळे पब पाहण्याची उत्सुकता त्या दोघाही पर्यटकांना होती. त्यामुळे ते दलालांचे शिकार बनले.

पर्यटकांना मारहाण...

थोड्यावेळाने तिथून बाहेर पडत असताना त्या दलाल आणि त्यांच्यासोबत असलेला बाउन्सर्सने या दोघांनाही बाहेर येऊ दिले नाही. शिवाय तुम्हाला विदेशी मुली पुरवतो, अशी ऑफरही दोघांना दिली.

त्यानंतर पर्यटकांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तिथून बाहेर पडण्याची मागणी केली. मात्र त्या बाउन्सर्संनी त्यांना खोलीत नेऊन मारहाण देखील केली. शिवाय त्यांच्याकडे असलेले सर्व पैसे उकळून ऑनलाइन अकाऊंटवरून 30,000 लुटले असल्याचा पुरावा पर्यटकांनी दाखवला.

ते म्हणाले की, फक्त आम्ही दोघेच नव्हे तर आमच्यासारखेच अनेकजण त्या खोलीमध्ये होते, ज्यांना लुबाडण्यात आले होते. पैसे लुटल्यानंतर ते तिथून बाहेर पडले. मात्र या सर्व प्रकारामुळे कळंगुटमधून म्हापसा बस स्थानकापर्यंत ते चालत आले.

...की घरी परत जाण्यासाठीही पैसे नाहीत!

यानंतर माध्यमांंनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, दोघांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. दोघेही जण घाबरले असल्यामुळे त्यांनी पोलीस तक्रार केली नसल्याचे सांगितले. जर आमच्या जीवाला काही धोका झाला तर याची जबाबदारी गोवा सरकार घेणार का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले की, आम्ही इतर राज्यांमध्येही फिरायला जातो; पण तिथे असे प्रकार कधीच घडले नाहीत. पण गोव्यामध्ये ह्या प्रकारामुळे आम्ही पूर्ण हादरून गेलो आहोत. त्यामुळे पुन्हा कधीही गोव्यात येणार नाही किंवा आमच्या मित्रमंडळी-नातेवाईकांनाही इथे न येण्याचा सल्ला देणार.

सध्या त्यांच्याकडे त्यांच्या गावी परतण्यासाठी देखील पैसे नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तेव्हा ते दरवेळी कामानिमित्त ज्या ट्रॅव्हल्समधून गोव्यात येतात किंवा इथे आल्यानंतर ज्यांच्याकडे भाड्याने गाडी घेतात त्या ओळखीच्या माणसांनी आणि माध्यमातील काही लोकांनी त्यांना अहमदनगरला परतण्यासाठी पैसे देऊ केले.

इथे पहा सविस्तर व्हिडिओ....

गोवा सरकारने त्वरित कारवाई करावी

शेवटी ते पर्यटक म्हणाले की, गोवा हे सर्वांचे आवडते पर्यटन स्थळ असल्यामुळे आम्हीही इथे आलो होतो. मात्र आमच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे आमचा गोवा पोलीस आणि सरकारवर अजिबात विश्वास उरलेला नाही.

हे सर्व प्रकार वेळीच थांबले पाहिजेत; कारण आमच्यासारख्या अनेक पर्यटकांना इथे लुटले जात आहे. गोवा सरकारने आणि पर्यटन विभागाने या गोष्टींवर लक्ष देऊन संबंधित पब आणि या दलालांवर त्वरित कारवाई करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com