Goan Tourist Places: पर्यटनस्थळं ठरताहेत रोजगार निर्मिती केंद्र

निसर्गरम्य सांगे : साळावली तुडुंब; युवावर्गात हायकिंगचा उत्साह
Savari Waterfalls
Savari WaterfallsDainik Gomantak
Published on
Updated on

Goan Tourist Places पावसाळा सुरू होताच सांगे भागातील पावसाळी पर्यटनाला बहर येतो. साळावली धरण, बॉटनिकल गार्डन, सिद्धनाथ पर्वत, सावरी धबधबा, मैनापी, पाली, उदेंगीसारखे धबधबे, प्रसिद्ध अशी बुडबुड तळी, श्री क्षेत्र दत्तगुंफा, हिवाळ्यातील स्ट्रॉबेरी लागवड, हिरवीगार कुळागरे, नयनरम्य निसर्गसंपदा अशा अनेक पर्यटनस्थळांनी सांगेचे फक्त वैभवच खुलविले नाही, तर रोजगार निर्मिती करण्यासाठी हातभारही लावला आहे.

साळावली धरणाचा जलाशय तुडुंब भरला की आपोआप देशी पर्यटकांची पावले साळावलीच्या दिशेने पडतात. दांडो-सांगेमार्गे कोटार्ली-शेळपे या मार्गाने गेल्यास ८ किमी अंतर कापावे लागते. तर सांगे-पाजीमळमार्गे गेल्यास थेट धरणाच्या पायथ्याशी जाता येते.

सांगे शहरातून केवळ तीन किमी अंतरावर हे ठिकाण आहे. लागलीच बॉटनिकल गार्डनमध्ये मनसोक्त आनंद घेता येतो. लहान मुलांना गार्डन ही पर्वणी झाली आहे. गार्डनच्या फाटकावरून दोनशे मीटर अंतर चालून गेल्यावर नयनरम्य आणि अथांग भरलेला जलाशय अनुभवता येतो.

Savari Waterfalls
Goa Tourist Season: यावर्षीचा पर्यटन हंगाम ‌गोव्यासाठी लाभदायी, 'एवढ्या' मोठ्या संख्येने सागरी मार्गाने पर्यटक झाले दाखल

सांगेहून 7 किमी अंतर कापून वालकिणी-भाटी येथील श्री सिद्धनाथ पर्वतावर युवावर्गात हायकिंगची क्रेझ निर्माण झालेली असते. त्याखालोखाल पावसाळ्यात पडणारा धबधबा अनुभवता येतो. सांगेहून तीस किमी अंतरावर नेत्रावळी गावात पोहोचता येते.

तिळामळ-जांबावलीमार्गे नेत्रावळीत गेल्यास अवघ्या अठ्ठावीस किमी अंतरात नेत्रावळी गाव आहे. तिथे गेल्यावर प्रथम बुडबुड तळीचा आनंद घेता येतो. शिवाय पांडवकालीन दत्तगुंफा पाहता येते.

त्यानंतर चार किमी अंतरावर सावरी धबधबा, एकदा नेत्रावळी अभयारण्य क्षेत्राची गेट पार केली की सावरी, पाली, मैनापी, उदेंगी हे बारामाही फेसाळत कोसळणारे धबधबे पाहता येतात. पैकी लहान मोठ्या पायऱ्यांवरून निसर्ग अनुभवत सावरी पाहता येतो.

तर मैनापी, पाली हे धबधबे साहसवीरांसाठी उपयोगी आहेत. उदेंगी धबधबाही तुडव गावात आहे. पर्यटकांना सुरक्षित आणि कमी अंतर चालून जाण्यासाठी तो उपयुक्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com