Goa Tourist Season: यावर्षीचा पर्यटन हंगाम ‌गोव्यासाठी लाभदायी, 'एवढ्या' मोठ्या संख्येने सागरी मार्गाने पर्यटक झाले दाखल

गत हंगामात 14 विदेशी, 30 देशी जहाजे दाखल: ‘कार्डेलिया एम्प्रेस’ 22 सप्टेंबरला मुरगाव बंदरात येणार
Tourist
TouristDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourist Season गत 2022-23 या वर्षीचा सागरी पर्यटन हंगाम ‌गोव्यासाठी पर्यटनदृष्ट्या लाभदायी ठरला. या पर्यटन हंगामात एकूण 44 देशी विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाली.

यात विदेशी 14 पर्यटक जहाजे तर 30 देशांतर्गत पर्यटक जहाजे दाखल झाली. यातून 85,622 देशी-विदेशी पर्यटक गोव्यात येऊन गोव्याच्या पर्यटनाचा आस्वाद घेतला.

येत्या 2023-24 या सागरी पर्यटन हंगामात एकूण 50 देशी विदेशी जहाजे गोव्यात दाखल होणार असून यातून १ लाखाहून अधिक पर्यटक गोव्यात येणार आहेत.

यंदाच्या सागरी पर्यटन हंगामाला 22 सप्टेंबर 2023 रोजी ‘कार्डेलिया एम्प्रेस’ या देशांतर्गत पर्यटक जहाजाने सुरुवात होणार असून 21 मे 2024 रोजी ‘सिल्वर मून’ या विदेशी पर्यटक जहाजाद्वारे सांगता होणार असल्याची माहिती जे. एम. बक्षीचे व्यवस्थापक गोविंद पेनूर्लेकर यांनी दिली.

Tourist
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जुआरीनगर येथील 33 वर्षीय इसमाला अटक

गत वर्षीचा सागरी पर्यटन हंगाम गोव्यासाठी फलदायी ठरला. 30 सप्टेंबर 2022 पासून ‘कार्डेलिया एम्प्रेस’ या देशांतर्गत जहाजाद्वारे पर्यटन हंगामाला सुरुवात झाली.

नंतर या संपूर्ण सागरी पर्यटक हंगामात ‘कार्डेलिया एम्प्रेस’ या जहाजाच्या एकूण 30 फेऱ्या गोव्यात मुरगाव बंदरात झाल्या.

या जहाजांतून ५१,७१० प्रवासी व जहाजातील १७,५२० कर्मचारी वर्ग मिळून ६९,२३० देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. २०२२-२३ मध्ये देशी पर्यटक जहाजांच्या १४ फेऱ्या झाल्या.

यातून ७२७७ प्रवासी व ५६१५ कर्मचारी मिळून १६,३९२ विदेशी पर्यटकांसह मुरगाव बंदरात ८५, ६२२ पर्यटक आले. हंगाम सांगता २६ मे रोजी ‘नौटीका’ द्वारे झाली.

Tourist
Goa Monsoon 2023: मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा....पण 'त्या' दोघींचे केवळ दैव बलवत्तर म्हणून...

22 सप्टेंबरपासून हंगाम

यंदाच्या सागरी पर्यटन हंगामाला 22 सप्टेंबर 2023 रोजी ‘कार्डेलिया एम्प्रेस’ या देशांतर्गत पर्यटक जहाजाने सुरुवात होणार असून 21 मे 2024 रोजी ‘सिल्वर मून’ या विदेशी पर्यटक जहाजाद्वारे सांगता होणार असल्याची माहिती जे. एम. बक्षीचे व्यवस्थापक गोविंद पेनूर्लेकर यांनी दिली.

विदेशी पर्यटक जहाजे युरोपीय देशातून दुबई, मस्कत, श्रीलंका, माले असा प्रवास करत भारतात मुंबई, न्यू मंगळुरू, कोची मार्गे प्रवास करून मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत. सर्व जहाजांच्या आगमन व स्वागताची तयारी चालू आहे.

-गोविंद पेनुर्लेकर, जे. एम. बक्षीचे व्यवस्थापक

Tourist
Lok Sabha Election: दक्षिण गोव्यात भाजपची मोर्चेबांधणी, काँग्रेसची रणनीती मात्र गुलदस्त्यात

ही जहाजे येणार-

सिल्वर मून, सेलेब्रिटी मिलेनियम, मार्च २०२४मध्ये सिल्वर व्हीस्पर, बोरीलस, क्रीस्टल सिंफनी, वीकिंग स्काय, विकींग नेपच्यून, एप्रिलमध्ये सेवन सीज मरीनर, क्रीस्टल सेरेनिटी, मरेल्ला डिस्कवरी-२, असूका II, सेवन सिज नेवीगेटर, तर मेमध्ये सेरेनाडे ऑफ दी सीज, इनसिग्नीया, रिवेरा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com