धावत्या गाडीच्या रूफटॉपवर तरुणीचा स्टंट, Video Viral; नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त करतायत संताप

girl rooftop car stunt viral video: पर्यटक म्हापसा- गिरी हायवेवर बंधूंद होऊन एका गाडीतून जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच गाजतोय
girl rooftop car stunt
girl rooftop car stuntDainik Gomantak
Published on
Updated on

गिरी: गोवा हा पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ आहे, मात्र इथे येणाऱ्या पर्यटकांना कधीकधी ते नेमकं काय करत आहेत याचं भान राहत नाही आणि अशा गोष्टी त्यांच्या जीवावर बेतू शकतात. शुक्रवारी (दि.१६) रोजी पर्यटक म्हापसा- गिरी हायवेवर बंधूंद होऊन एका गाडीतून जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच गाजतोय. पर्यटनासाठी आलेल्या या लोकांना स्वतःच्या जीवाची किंमत नाही का? असा प्रश्न हा व्हिडिओ बघून अनेकांनी उपस्थित केलाय.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी रुफटॉप गाडीतून जाताना दिसतायत, मात्र ती मुलगी रुफटॉप गाडीत वर चढून बसलीये आणि मुलगा देखील खाली उभा आहे. गाडी वेगात जातात असल्याने होणाऱ्या परिणामांची काळजी न करता पर्यटकांकडून सुरु असलेल्या हलगर्जीपणाबद्दल अनेकांनी राग व्यक्त केला आहे.

एका सोशल मीडियाच्या वापरकर्त्याने तर बॉलीवूड सिनेमांना यासाठी जबाबदार ठरवलं आहे, लोकं बॉलिवूड सिनेमा बघतात आणि अशा गोष्टी करतात, मात्र यामध्ये आपल्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो याची भीती त्यांना वाटत नाही.

राज्यात अशा घटना घडत असताना प्रशासन किंवा पोलीस यांपैकी कोणीही यावर आक्षेप घेत नाहीये आणि म्हणूनच पर्यटकांची मनमानी सुरु असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. अशा घटनांमुळे बाकी वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे पर्यटकांना गाड्या रेंटवर देणाऱ्यांची कानउघाडणी केली पाहिजे.

girl rooftop car stunt
Russian Tourists: गोवा-रशिया हवाई संपर्क होणार अधिक सुलभ! मुख्यमंत्र्यांची रशियन वाणिज्यदूतांशी साधला संवाद

गोव्यात टिंटेड गाड्यांप्रमाणेच पर्यटकांना रेंटेड गाड्या देणाऱ्यांवर काही नियम लागू केले गेलेत मात्र यांचं पालन होत नसल्याने वेळीच यावर कारवाई केली जावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com