Calangute Beach : कळंगुट बिचवर हैद्राबादच्या पर्यटकाला मारहाण; हजारो रुपयांची लूट

चाकुचा धाक दाखवत मौल्यवान वस्तू व रोकड लंपास केली.
Tourist from Hyderabad
Tourist from Hyderabad Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Beach Tourist News : कळंगुट-बागा बीचवर पाच जणांच्या टोळीने हैदराबादहून आलेल्या एका पर्यटकाला लुटून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कळंगुट बीच परिसरात घडली. संशयितांनी पर्यटकाच्या मौल्यवान वस्तू व रोकड लंपास केली.

Tourist from Hyderabad
North Goa : उत्तर गोव्यातील नदी, धबधब्यांवर जाताय? जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची सूचना

याबाबत अधिक माहिती अशी की, हैदराबाद येथील शिव कुमार हे पर्यटनासाठी गोव्यात आले होते. शिवा कुमार पर्यटनाचा आनंद लुटत असताना कळंगुट बीच परिसरात त्यांच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली.

कळंगुट बीचवर पाच युवकांच्या टोळीने शिव कुमार यांना चाकुचा धाक दाखवत त्यांच्या मौल्यवान वस्तू व रोकड लंपास केली. यावेळी शिव कुमार यांना संशयिताच्या टोळक्याने मारहाण करुन जखमी केले.

तसेच यावेळी शिव कुमार यांच्याकडील मोबाईल फोन, सोन्याची चैन, 5 हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड लंपास केली. या दुर्दैवी घटनेने पर्यटकाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत पोलिस स्थानकांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tourist Drowns In Goa
Advocate Ankur Kumar Attack Goa
Baga Beach Tourist Death
Baga Beach Tourist Death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com